Tuch Moraya Song Release Soon Instagram
मनोरंजन बातम्या

Kokan Hearted Girl New Song Teaser: कोकण हार्टेड गर्ल अंकिता दिसणार नव्या भूमिकेत; लवकरच झळकणार ‘या’ म्युझिक व्हिडीओमध्ये

Ankita Walawalkar And Vishal Phale New Song Release: प्रसिद्ध सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर अंकिता वालावलकर आणि विशाल फले यांचं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला नवं गाणं येत आहे.

Chetan Bodke

Tuch Moraya Song Release Soon: "दादर अभिमान गीता"च्या अभूतपूर्व यशानंतर प्रणिल आर्ट्स या निर्मिती संस्थेचा दुसरा म्युझिक व्हिडीओ येत्या २० ऑगस्टला विनायक चतुर्थीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होण्यास आता सज्ज झाला आहे.

"तूच मोरया" असे या म्युझिक व्हिडीओचे नाव असून आपल्या सर्वांची लाडकी कोकणहार्टेड गर्ल अर्थातच अंकिता वालावलकर या म्युझिक व्हिडीओमध्ये झळकणार आहे. अंकिताचा हा पहिला-वहिला म्युझिक व्हिडिओ आहे.

अंकिता आणि अभिनेता विशाल फाळे ही नवी जोडी या गाण्याच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकतेच या म्युझिक व्हिडीओचे पोस्टर सोशल मीडियावर लॉंच करण्यात आले आहे.

देवाची व्याख्या आतापर्यंत एका विशिष्ट स्वरूपात आपण सर्वानी पाहिली आहे, पण देव म्हणजे निव्वळ एक आकृती नव्हे, तर त्याची विशालता ह्या भूतलावर आहे, ती पाहता आली पाहिजे. आयुष्यात आपण नेहमी नकारात्मक गोष्टींचा विचार अधिक करतो त्यामुळे साहजिकच सकारात्मक दृष्टिकोन काहीसा डावलला जातो. (Song)

ह्याच धर्तीवर एका गावातील गरीब मराठी जोडप्याला बाप्पाचा साक्षात्कार अनोख्या पद्धतीने होतो आणि काबाडकष्ट करत असताना निराशेतून आशेचा किरण त्यांना देऊन जातो अशी या गाण्याची संकल्पना असल्याचे प्रणिल आर्ट्सचे निर्माते, दिग्दर्शक प्रणिल हातिसकर ह्यांनी सांगितले. प्रणिल आर्ट्स ह्या संस्थेचे हे दुसरे पुष्प असून ह्या गाण्याचे गीतलेखन, गायन, निर्मिती, दिग्दर्शन अशी चौफेर भूमिका प्रणिल हातिसकर ह्यांनी एक हाती बजावली आहे. (Entertainment News)

"तूच मोरया"च्या निमित्ताने सोशल मीडियावरील आघाडीची तरुणी अंकिता वालावलकर नव्या क्षेत्रात दमदार पदार्पण करत असून अंकितासाठी हा एक मोठा ब्रेक ठरणार आहे. नुकताच प्रदर्शित झालेला अंकिताचा ह्या गाण्यातील लूक सोशल मीडियावर प्रचंड गाजतो आहे. बाप्पाचे गाणं, त्याला गोष्टीनुरुप लाभलेली अनोखी विचारधारा, प्रणिलचे दिग्दर्शन, ताल धारायला लावणार संगीत, अंकिताचे पदार्पण, विशालची उत्तम साथ ह्यासर्व गोष्टींमुळे ह्या गाण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे यात शंका नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis : संकुचित विचार मराठी माणसाला शोभत नाही; शिंदेंच्या जय गुजरात घोषणेवर फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर

WhatsApp Blue Tick : व्हॉट्सॲपवर ब्लू टिक मिळवणं झालं सोपं, जाणून घ्या भन्नाट माहिती

Sonakshi Sinha: सोनाक्षी सिन्हा गुडन्यूज देणार? का सुरू आहे अशी चर्चा

Jai Gujarat Row: शिंदेंच्या पक्षाची स्थापना सूरतमध्ये झाली; जय गुजरात’वरून संजय राऊतांचा घणाघात | VIDEO

Maharashtra Live News Update: चामर लेणी येथे झालेल्या ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

SCROLL FOR NEXT