Sitaare Zameen Par Collection SAAM TV
मनोरंजन बातम्या

आमिर खानच्या Sitaare Zameen Par ची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी; 'भूल चुक माफ' चित्रपटाला टाकले मागे, कलेक्शनचा आकडा किती?

Sitaare Zameen Par Box Office Collection Day 5 : आमिर खान आणि जिनिलियाचा 'सितारे जमीन पर' चित्रपट बॉक्स ऑफिस गाजवत आहे. चित्रपटाने पाचव्या दिवशी किती कोटी कमावले जाणून घेऊयात.

Shreya Maskar

आमिर खानचा (Aamir Khan ) 'सितारे जमीन पर' (Sitaare Zameen Par) चित्रपट 20 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला आला. अवघ्या पाच दिवसांत चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. 'सितारे जमीन पर' चित्रपटाचे दिग्दर्शन आर.एस. प्रसन्ना यांनी केले. 'सितारे जमीन पर' हा चित्रपट 2007 साली रिलीज झालेल्या 'तारे जमीन पर' चित्रपटाचा सीक्वल आहे. चित्रपटाचे आतापर्यंतचे कलेक्शन जाणून घेऊयात.

'सितारे जमीन पर' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 5

'सितारे जमीन पर' चित्रपटाने आतापर्यंत एकूण 75.15 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. चित्रपटने पहिल्या दिवशी 10.7 कोटी रुपयांची कमाई केली. वीकेंडा चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये मोठी वाढ पाहायला मिळाली. चित्रपटाने शनिवारी 21.50 कोटी तर रविवारी 29.00 कोटींचा व्यवसाय केला. मात्र या तुलनेत 'सितारे जमीन पर'ने सोमवारी कमी कलेक्शन केले. चित्रपटाने सोमवारी 8.50 कोटी रुपये कमावले. आता चित्रपटाने पाचव्या दिवशी किती कोटींचा व्यवसाय केला, जाणून घेऊयात.

  • दिवस पहिला - 10.7 कोटी रुपये

  • दिवस दुसरा - 21.50 कोटी रुपये

  • तिसरा दिवस - 29.00 कोटी रुपये

  • चौथा दिवस - 8.5 कोटी रुपये

  • पाचवा दिवस - 8.50 कोटी रुपये

  • एकूण - 75.15 कोटी रुपये

'सितारे जमीन पर'ने 'भूल चुक माफ'चा रेकॉर्ड मोडला

'सितारे जमीन पर' चित्रपटाने 'भूल चुक माफ' सिनेमाचा रेकॉर्ड मोडला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, आमिर खानच्या 'सितारे जमीन पर' चित्रपटाने 75.15 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. तर 'भूल चुक माफ' चित्रपटाने फक्त 74.65 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

आमिर खानची भूमिका

'सितारे जमीन पर' चित्रपटात आमिर खान एका बास्केटबॉल कोचच्या भूमिकेत दिसत आहे. जो दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवत आहे. चित्रपटातील आमिर खान आणि जिनिलियाची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली आहे. 'सितारे जमीन पर' भविष्यात किती कोटींचा व्यवसाय करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: प्रियांश-कॉनॉलीच्या वादळी खेळीपुढे लखनौचा संघ ढेर, पंजाब किंग्सच्या विजयाचा पंजा

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

SCROLL FOR NEXT