Sitaare Zameen Par Collection  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Sitaare Zameen Par Collection : दुसऱ्या दिवशी 'सितारे जमीन पर'ची उंच भरारी, आमिर-जिनिलियाच्या चित्रपटानं कमावले तब्बल 'इतके' कोटी

Sitaare Zameen Par Box Office Collection Day 2 : बॉलिवूड अभिनेता आमिर खानच्या 'सितारे जमीन पर' चित्रपटाने दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. दोन दिवसांत चित्रपटाने किती कमावले, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खानचा (Aamir Khan ) बहुप्रतिक्षित चित्रपट 'सितारे जमीन पर' (Sitaare Zameen Par) अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवसापासून बंपर कलेक्शन केले आहे. आमिर आणि जिनिलियाचा (Genelia ) 'सितारे जमीन पर' हा चित्रपट 20 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दोन दिवसांत चित्रपटाने किती कोटींचा व्यवसाय केला, जाणून घेऊयात.

'सितारे जमीन पर' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 2

आमिर खान आणि जिनिलिया देशमुखच्या 'सितारे जमीन पर' चित्रपटाने रिलीजच्या दुसऱ्या दिवशी उंच भरारी घेतली आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 'सितारे जमीन पर' चित्रपटाने पहिल्या दिवशी 10.7 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी हिंदीत 10.6 कोटी रुपये, तमिळमध्ये 0.5 कोटी रुपये आणि तेलुगूमध्ये देखील 0.5 कोटी रुपये कमावले आहे.

'सितारे जमीन पर' चित्रपटाने दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये मोठी वाढ झाली आहे. रिलीजच्या पहिल्या वीकेंडला शनिवारी 'सितारे जमीन पर' चित्रपटाने 21.50 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. त्यामुळे दोन दिवसांत चित्रपटाने एकूण 32.20 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. आता रविवारी चित्रपट किती कोटीचे कलेक्शन करेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

  • दिवस पहिला - 10.7 कोटी रुपये

  • दिवस दुसरा - 21.50 कोटी रुपये

  • एकूण - 32.20 कोटी रुपये

'सितारे जमीन पर' स्टारकास्ट

'सितारे जमीन पर' चित्रपटात आमिर खानसोबत बॉलिवूडची अभिनेत्री जिनिलिया देशमुख देखील झळकली आहे. या चित्रपटात नवीन कलाकार देखील पाहायला मिळले आहेत. यात अरूष दत्ता, गोपी कृष्ण वर्मा, संवित देसाई, वेदांत शर्मा, आयुष भंसाली, आशीष पेंडसे, ऋषी शहानी, ऋषभ जैन, नमन मिश्रा आणि सिमरन मंगेशकर यांचा समावेश आहे.

'सितारे जमीन पर' हा चित्रपट 2007 साली रिलीज झालेल्या 'तारे जमीन पर' चित्रपटाचा सीक्वल आहे. चित्रपटात आमिर खान एका बास्केटबॉल कोचच्या भूमिकेत दिसत आहे. जो दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवत आहे. 'सितारे जमीन पर' चित्रपटाचे दिग्दर्शन आर.एस. प्रसन्ना यांनी केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बांगड्यांचा ढिग अन् नेकलेस; ZP सदस्याकडे पोलिसांना सापडलं 4 कोटी रुपये किंमतीचे ३ किलो सोन्याचे दागिने

Shocking: महिला नेत्याचा संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह, बॉयफ्रेंडवर हत्येचा आरोप; राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये कोयता हातात घेऊन दहशत, दोन आरोपींची पोलिसांकडून धिंड

High Court: शपथ घेताना देवी-देवता, भारत माता, गुरूंचे नाव घेतले; भाजपच्या २० नगरसेवकांची शपथ हायकोर्टाकडून रद्द

Maharashtra Politics: शिवसेनेत गेलेले 6 बंडखोर खासदार अपात्र होणार? ठाकरेंनी टाकला मोठा डाव

SCROLL FOR NEXT