Singham Again Vs Bhool Bhulaiyaa 3 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Singham Again Vs Bhool Bhulaiyaa 3: रूह बाबा की सिंघम, बॉक्स ऑफिसवर कुणाची चलती?

Singham Again Vs Bhool Bhulaiyaa 3 Box Office Collection: सध्या बॉक्स ऑफिसवर 'सिंघम अगेन' आणि 'भूल भुलैया 3' यांची स्पर्धा पाहायला मिळत आहे. दोन्ही चित्रपट प्रेक्षकांचे आवडते आहेत. आतापर्यंत कोणी किती कमाई केली जाणून घेऊयात.

Shreya Maskar

सध्या बॉक्स ऑफिसवर दोन चित्रपटांची चर्चा पाहायला मिळत आहे. एकीकडे 'सिंघम अगेन' (Singham Again) तर दुसरीकडे 'भूल भुलैया 3' (Bhool Bhulaiyaa 3) प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. हे दोन्ही चित्रपट दिवाळीच्या शुभ मुहूर्तावरव रिलीज झाला आहे. हे चित्रपट १ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. आता हा चित्रपट रिलीज होऊन ९ दिवस झाले आहेत. रूह बाबा की सिंघम बॉक्स ऑफिसवर कोणी बाजी मारली जाणून घेऊयात.

'भूल भुलैया 3' बॉक्स ऑफिसवर 9 दिवस

रूह बाबाची जादू चाहत्यांवर पसरलेले आहे. 'भूल भुलैया 3' चित्रपट रिलीज होऊन आज 9 दिवस झाले आहेत. या चित्रपटात कार्तिक आर्यन, तृप्ती डिमरी, विद्या बालन आणि माधुरी दीक्षित हे कलाकार पाहायला मिळत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'भूल भुलैया 3'चे शनिवारचे कलेक्शन 15 कोटी 50 लाख रुपये झाले आहे. तर आतापर्यंत एकूण बॉक्स ऑफिसवर 'भूल भुलैया 3' ने 183 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

'सिंघम अगेन' बॉक्स ऑफिसवर 9 दिवस

पहिल्या दिवसापासूनच 'सिंघम अगेन' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटात तगडे कलाकार पाहायला मिळत आहे. यात अजय देवगण, दीपिका पदुकोण, करीना कपूर, रणवीर सिंह, अक्षय कुमार असे अनेक तगडे कलाकार पाहायला मिळत आहे. तर खलनायकाच्या भूमिकेत अर्जुन कपूर आहे. शनिवारी 'सिंघम अगेन'ने 11 कोटी 50 लाखांची कमाई केली आहे. तर आतापर्यंत एकूण बॉक्स ऑफिसवर 'सिंघम अगेन' ने 192 कोटी 50 लाखांची कमाई केली आहे.

'भूल भुलैया 3' VS 'सिंघम अगेन'

मीडिया रिपोर्टनुसार, जगभरातील कलेक्शनमध्ये 'सिंघम अगेन'ने 'भूल भुलैया 3'चा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. 'सिंघम अगेन' या चित्रपटाने बाजी मारली आहे. तर 'भूल भुलैया 3'ने आपल्या चित्रपटाच्या बजेटपेक्षा जास्त कमाई केली आहे. 'सिंघम अगेन'ने बाजी मारली आहे. रोहित शेट्टीचा'सिंघम अगेन' 375 कोटी रुपयांमध्ये बनला असून या चित्रपटाने जगभरात 275 कोटींची कमाई केली आहे. तर दुसरीकडे बनवण्यासाठी 375 कोटी रुपये खर्च आला होता आणि आतापर्यंत या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर 275 कोटींची कमाई केली आहे. 'भूल भुलैया 3' 150 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनला असून आतापर्यंत या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर 254 कोटी रुपयांचा गल्ला केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : दिव्यांग शेतकऱ्यांच्या कांद्याला अवकाळी पावसाचा फटका

Sugarcane juice: उस आणि मशिन न वापरता घरच्या घरी तयार करा उसाचा रस

Heart Disease Diet : चाळीशीनंतरही होणार नाहीत ह्रदयविकाराच्या समस्या, आहारात करा या ४ पदार्थांचा समावेश; डॉक्टरांनी दिला सल्ला

Designer Blouse: लग्नसराईत प्लेन साडीत पण दिसाल उठून, ट्राय करा हे ७ ट्रेंडी युनिक स्वस्त डिझायनर ब्लाऊज

Chocolate Dry fruit Shake: उन्हाळ्यात प्या चॉकलेट ड्राय फ्रुट शेक; राहाल दिवसभर फ्रेश

SCROLL FOR NEXT