Rahul Vaidya-Disha Parmar Instagram @dishaparmar
मनोरंजन बातम्या

Rahul Vaidya-Disha Parmar Baby Girl: मुलगी झाली हो! गायक राहुल वैद्य झाला बाबा, पत्नी दिशा परमाने दिला गोंडस परीला जन्म

Priya More

Rahul Vaidya And Disha Parmar:

गणपती बाप्पाच्या (Ganpati Bappa) आगमनासोबत गायक राहुल वैद्य (Singer Rahul Vaidya) आणि टीव्ही अभिनत्री दिशा परमानर (Actress Disha Parmar) यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. राहुल वैद्य बाबा झाला आहे. राहुलची पत्नी दिशा परमारने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. चिमुकलीच्या रूपाने घरी लक्ष्मीचे आगमन झाल्यामुळे राहुल वैद्यच्या घरी आनंदाचे वातावरण आहे. राहुलने बाबा झाल्याची आनंदाची गोड बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. राहुलने गोंडस फोटो शेअर करत बाबा झाल्याचे सांगितले.

सगळीकडे गणेशोत्सवानिमित्त आनंदाचे वातावरण आहे. सर्व सेलिब्रिटी गणपती बाप्पाची सेवा करण्यामध्ये दंग आहेत. तर दुसरीकडे 'बिग बॉस 14' फेम राहुल वैद्य आणि दिशा परमार यांच्या आयुष्यामध्ये नव्या पाहुण्याचे आगमन झाल्यामुळे आनंदाचे वातावरण आहे. राहुल वैद्य आणि दिशा परमार यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक एका गोंडस हत्तीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत त्यांनी मुलगी झाल्याची गोड बातमी शेअर केली.

राहुल वैद्यने पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये असे लिहिले की, 'आम्हाला मुलगी झाली आहे. मम्मी आणि बाळ पूर्णपणे निरोगी आहेत.' ही पोस्ट शेअर करताना त्याने पत्नी दिशाच्या प्रसूतीसाठी मदत करणाऱ्या डॉक्टर आणि इतर सदस्यांचे आभार मानले आहे. राहुलने बाबा झाल्याची बातमी सोशल मीडियावर शेअर करताच दोघांच्याही चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे.

राहुल वैद्य आणि दिशा परमारचे मित्र परिवार आणि चाहत्यांनी दोघांवर देखील शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. एका युजरने कमेंट केली, 'तुमच्या मुलीला खूप प्रेम आणि आशीर्वाद.' दुसर्‍या युजरने लिहिले, 'माशाल्लाह, तुमची मुलगी निरोगी राहो आणि आमचे सर्व प्रेम लहान दिशाला.' दुसर्‍या युजरने लिहिले, 'पालकांचे अभिनंदन, बाळाला पाहण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही.'

चाहत्यांसह राहुल वैद्यचे मित्रही त्याचे अभिनंदन करत आहेत. 'साथ निभाना साथिया' अभिनेत्री तान्या शर्माने दोघांचे अभिनंद करत लिहिले की, 'ओह माय गॉड, तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा.' बिग बॉस 13 मध्ये दिसलेली सोशल मीडिया इन्फ्लुएंसर शेफाली बग्गा हिने लिहिले, 'गणेशासोबत लक्ष्मी देखील तुमच्या घरी आली आहे, खूप खूप अभिनंदन.' याशिवाय नकुल मेहता, राजीव अदातिया, रियाझ यांच्यासह अनेक स्टार्सनी या जोडप्याला छोट्या पाहुण्याच्या आगमनाबद्दल शुभेच्छा दिल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budh Uday: ऑक्टोबर महिन्यात बुध ग्रहाचा होणार उदय; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन

Rain Alert : मराठवाडा-विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; मुंबई-पुण्यात कसं असेल वातावरण? वाचा वेदर रिपोर्ट

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT