Rahul Vaidya Daughter First Photo Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rahul Vaidya Daughter First Photo: राहुल वैद्य आणि दिशा परमारच्या मुलीची पहिलीची झलक, Photo होतोय व्हायरल

Rahul Vaidya And Disha Parmar Daughter: राहुल आणि दिशा आई-बाबा झाल्यानंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अशामध्ये राहुल आणि दिशाच्या मुलीची पहिली झलक समोर आली आहे.

Priya More

Rahul Vaidya And Disha Parmar Daughter:

प्रसिद्ध गायक राहुल वैद्य (Rahul Vaidya) आणि त्याची पत्नी टीव्ही अभिनेत्री दिशा परमार (Disha Parmar) यांच्या घरी नुकताच चिमुकल्या पाहुणीचं आमगन झालं. हे कपल नुकताच आई-बाबा झाले. घरामध्ये लक्ष्मीचे आगमन झाल्यामुळे राहुल आणि दिशा या दोघांच्या कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. २० सप्टेंबर रोजी या कपलने त्यांच्या आयुष्यातील एका नवीन अध्यायाची सुरुवात केली. राहुल आणि दिशा आई-बाबा झाल्यानंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अशामध्ये राहुल आणि दिशाच्या मुलीची पहिली झलक समोर आली आहे.

राहुल वैद्यची बहीण श्रुती वैद्यने कुटुंबातील नवीन पाहुण्याचा फोटो शेअर केला आहे. हा क्षण राहुल आणि दिशाच्या आयुष्यातील एक नवीन सुरुवात आहे. सध्या ते नवीन जबाबदारी म्हणजेच पालक होण्याचा आनंद घेत आहेत. राहुल वैद्यच्या बहिणीने इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या फोटोमध्ये दिसत आहे की, राहुलची बहीण श्रुती, त्याचे वडील आणि आई बाळाचे लाड करत आहेत. घरात आलेल्या नव्या पाहुणीसाठीचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे.

राहुलच्या आईने म्हणजेच बाळाच्या लाडक्या आजीने अतिशय प्रेमाने तिला मिठीमध्ये घेतलं आहे. तर बाळाचे आजोबा आणि आत्या हे देखील शेजारी बसून तिचा लाड करताना दिसत आहेत. हा फोटो खूपच सुंदर आहे. या आनंदी प्रसंगी सर्वांनी दिलेला आशीर्वाद आणि प्रेमाबद्दल आभार मानत श्रुती वैद्यने कॅप्शनमध्ये कृतज्ञता व्यक्त केली आहे. श्रुतीच्या या पोस्टला खूप चांगली पसंती मिळत आहे. महत्वाचे म्हणजे राहुल आणि दिशाच्या मुलीची पहिली झलक पाहण्यासाठी त्यांचे चाहते खूपच उत्सुक होते. बाळाचा फोटो पाहून ते देखील आनंदी झाले आहेत.

दरम्यान, बाबा झाल्यामुळे राहुल वैद्य खूपच आनंदी आहे. राहुल वैद्यने आपल्या वाढदिवशीच आपल्या गोंडस मुलीला आणि पत्नी दिशाला हॉस्पिटलमधून घरी आणले. हा दिवस माझ्यासाठी खूपच मोठा आहे. ऐवढं मोठं आणि मौल्यवान गिफ्ट जगात क्वचितच कोणाला तरी मिळू शकतं, अशी प्रतिक्रिया राहुलने माध्यमांशी बोलताना दिली होती. दरम्यान, दिशा आणि राहुलची लव्हस्टोरी खूपच खास आहे. 'जब वे याद तेरी' या गाण्याच्या सेटवर दोघांची भेट झाली होती. तिथूनच त्यांच्या लव्हस्टोरीला सुरुवात झाली. त्यानंतर 'बिग बॉस १४' मध्ये राहुलने दिशाला प्रपोझ केला. त्यानंतर बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर त्याने दिशासोबत लग्न केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT