Himansh Kohli SAAM TV
मनोरंजन बातम्या

Himansh Kohli: नेहा कक्करचा EX बॉयफ्रेंड चढला बोहल्यावर, मंदिरात घेतले सात फेरे!

Himansh Kohli Wedding Photos : नेहा कक्करचा एक्स बॉयफ्रेंड नुकताच लग्नबंधनात अडकला आहे. हिमांश कोहलीने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो पोस्ट करून ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे.

Shreya Maskar

नेहा कक्करचा (Neha Kakkar) एक्स बॉयफ्रेंड हिमांश कोहली (Himansh Kohli Wedding) नुकताच लग्नबंधनात अडकला आहे. त्याच्या लग्न सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हिमांश कोहलीचा लग्न सोहळा नवी दिल्लीत पार पडला. त्यांनी साध्य पद्धतीने लग्न केले आहे.

अभिनेता हिमांश कोहली वयाच्या 35व्या वर्षी लग्नबंधनात अडकला आहे. नवी दिल्लीत एका मंदिरात त्यांनी विनीसोबत लग्न केलं आहे. हा लग्न समारंभ १२ नोव्हेंबरला मंगळवारी पार पडला. हिमांशुने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. हिमांश कोहलीने विनीसोबत अरेंज मॅरेज केलं आहे. त्यांच्या लग्नाला घरातील सदस्य आणि काही जवळचे मित्र मंडळी उपस्थित होते. हा लग्नसोहळा खासगीत पार पडला.

हिमांश आणि विनी दोघही लग्नामध्ये खूपच सुंदर दिसत होते. हिमांशने गुलाबी रंगाचा कुर्ता परिधान केला होता आणि त्यासोबत पांढरी धोती नेसली होती.तर दुसरीकडे विनीने गुलाबी रंगाची सुंदर साडी नेसली होती. दोघही खूपच क्यूट दिसत आहेत. हिमांशने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंना त्यांनी एक हटके कॅप्शन दिलं आहे. त्यांनी लिहिलं की, "अग्नि की शपथ, फेरे की धारा, और आत्मा की मिलन की आध्यात्मिक यात्रा – एक नई शुरुआत की ओर" त्यांच्या पोस्टवर चाहत्यांकडून आणि सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

हिमांश कोहलीला 'यारियां' या चित्रपटातून खरी ओळख मिळाली. त्यानंतर त्यांने अनेक हिट चित्रपट केलं आहेत. हिमांशुने आपल्या अभिनयाने चाहत्यांना वेड लावले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Accident : पुण्यात भीषण अपघात; वर्षश्राद्धाला जाताना काळाचा घाला; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Maharashtra Live News Update: भंडाऱ्यात मुसळधार पावसाची हजेरी...

Strong Bones : हाडांना कमजोर करतात हे 7 अन्नपदार्थ; तज्ज्ञांनी दिला इशारा

मुंबईत पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; राहत्या घरात गळफास घेत आयुष्य संपवलं

Crime : प्रेमा तुझा रंग कसा? एक्स गर्लफ्रेंडला ९ वेळा चाकूने भोसकलं, नंतर बॉयफ्रेंडने स्वत: आयुष्य संपवलं

SCROLL FOR NEXT