Arijit Singh SAAM TV
मनोरंजन बातम्या

Arijit Singh :अरिजीतचा मराठमोळा स्वॅग; पुण्याच्या कॉन्सर्टमध्ये गायलं मराठी गाणं, चाहते झालं फिदा

Arijit Singh Viral Video: गायक अरिजीत सिंहने पुण्याच्या कॉन्सर्टमध्ये मराठी गाणे गायले आहे. त्याच्या आवाजाने वातावरण मंत्रमुग्ध झाले आहे. त्याच्या या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षांव होत आहे.

Shreya Maskar

गायक अरिजित सिंहने (Arijit Singh) कायमच आपल्या आवाजाने चाहत्यांना भुरळ घातली आहे. त्यांच्या कॉन्सर्टला नेहमीच गर्दी पाहायला मिळते. चाहते त्याच्या कॉन्सर्टची आतुरतेने वाट पाहत असतात. अरिजीतचा मोठा चाहता वर्ग आहे. लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच त्याच्या गाण्याने वेड लावले आहे. अरिजित सिंहचा नुकताच पुण्यातील एमसीए इंटरनॅशनल स्टेडियमध्ये लाइव्ह कॉन्सर्ट पार पडला.

अरिजितच्या पुण्यातील कॉन्सर्टला (Pune Live Concert) तुफान गर्दी पाहायला मिळाली. या कॉन्सर्टमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या कॉन्सर्टमध्ये चक्क अरिजित सिंहने मराठी गाणे गायले आहे. अरिजित सिंह 'जीव रंगला' (Jeev Rangla - Jogwa) हे मराठी गाणे गायले आहे. हे सुपरहिट गाणे 'जोगवा' या मराठी चित्रपटातील आहे. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. अरिजित सिंहच्या सुरेल आवाजात हे गाणे ऐकताना अंगावर काटा येतो.

अरिजित सिंहच्या या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्स आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे. चाहते त्याच्या आवाजाचे कौतुक करताना दिसत आहे. तर काहीजण त्याच्या मराठी गाण्याचे. तसेच त्याचा आवाज जबरदस्त आहे असे म्हणत आहे. अरिजित सिंहने कॉन्सर्टला मराठी गाणे गाऊन लोकांची मनं जिंकली आहेत. त्याचे गाणे सुरू होताच प्रेक्षकांना खूप आनंद झाला आणि ते त्याच्या गाण्यात मग्न झालेले पाहायला मिळाले.

अरिजित सिंह अनेक वेळा त्याच्या मराठी गाण्यामुळे चांगलाच चर्चेत असतो. अरिजित सिंहने आजवर अनेक हिट गाणी गायली आहेत. त्याच्या गाण्यामुळे चित्रपटाची शोभ वाढते. 'आशिकी २' च्या गाण्यामुळे अरिजित सिंहला खूप लोकप्रियता मिळाली आहे. अरिजित सिंहच्या कॉन्सर्टकडे आणि नवीन गाण्याकडे चाहत्यांचे कायमच लक्ष लागून असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला प्रकरण, संतोष चव्हाणचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

ChatGPT 80s Photo Trend: ८०s रेट्रो लूकची क्रेझ वाढली; व्हायरल ट्रेंड 'असा' करा ट्राय

मनुस्मृतीविरोधी आंदोलनादरम्यान काँग्रेस नेत्याची प्रकृती बिघडली; तातडीनं रुग्णालयात दाखल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, ८ व्या वेतन आयोगात ४० वर्षे जुना नियम बदलणार

Pune : धुक्याची चादर अन् उंचावरून कोसळणारे धबधबे, पावसाच्या सरींमध्ये फिरा पुण्यातील 'हे' ठिकाण

SCROLL FOR NEXT