SAAM TV SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi : बिग बॉस घरात अवतरली 'चंद्रा'; अभिजीतनं केला भन्नाट डान्स, पाहा VIDEO

Abhijeet Sawant : बिग बॉस घरात मनोरंजनाचा धमाका पाहायला मिळत आहे. अभिजीतने चंद्रा गाण्यावर डान्स करून घराच वातावरण बदलले आहे.

Shreya Maskar

यंदाचा 'बिग बॉस मराठी'चं (Bigg Boss Marathi) पर्व दिवसेंदिवस रंगत चालले आहे. प्रत्येकजण आपला गेम दाखवत आहेत. नियमित नवनवीन राडा पाहायला मिळत आहे. भांडण आणि वादांसोबतच घरात मोठ्या प्रमाणात मनोरंजनही होत आहे.

बिग बॉस घराच चक्क अभिजीतने साडी नेसून डान्स केला आहे. इंडियन आयडॉल विजेता गायक अभिजीत सावंत यांनी चंद्रा या गाण्यावर ठेका धरला आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मिडिया खूप व्हायरल होत आहे.

जान्हवी बिग बॉसला विनंती करते की, "अभिजीतला (Abhijeet Sawant) लावणी करायला लावा." हे ऐकताच बॉस घरी चंद्रा गाणं वाजवतात आणि त्या गाण्यावर अभिजीत भन्नाट डान्स करतो. अभिजीतच्या मनमोहक अदांनी चाहते घायाळ झाले आहेत. या व्हिडीओमध्ये अभिजत साडी सावरत डान्स करताना पाहायला मिळत आहे. घरातील इतर सदस्यांना हसू अनावर होत आहे. घरात टाळ्या आणि शिट्ट्याचा वर्षाव होताना पाहायला मिळाले. अभिजीतच्या डान्समुळे घरातील वातावरण छान आणि फ्रेश झाले.

अभिजीतच्या डान्स व्हिडीओवर चाहत्याने कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस पाडला आहे. सध्या नव्या आठवड्याचा कॅप्टन अरबाज झाला आहे. अरबाज बिग बॉस घरात दुसऱ्यांदा कॅप्टन बनला आहे. त्याच्या कॅप्टन्सी मागे निक्कीचा मोठा हात आहे. आता अरबाज कशी कॅप्टन्सी निभवणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागून आहे. तसेच या आठवड्यात घराचा कोण निरोप घेणार तसेच बिग बॉस घरात अजून काय नवा राडा पाहायला मिळणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: परळीतील दिवंगत व्यापारी महादेव मुंडे यांच्या मुलाला मारहाण

Beed Crime : मुंडेंच्या मुलाला कराड समर्थकाची मारहाण, ट्युशनवरून येताना अडवले अन्...

Air Strike : पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर एअरस्ट्राइक; रमजानमध्ये झालेल्या भीषण हल्ल्यात १७ जणांचा मृत्यू

Bribe Case: मोठी बातमी! फाईल पुढे सरकवण्यासाठी ठेकेदाराकडे पैशांची मागणी; 1 लाख 30 हजारांची लाच घेताना मनपा कंत्राटी अभियंत्याला रंगेहाथ पकडलं

३ मुलांना विष पाजले, बायकोचा गळा चिरला आणि स्वत:ला गळफास लावला, कुटुंबाची सामूहिक आत्महत्या; टोकाचे पाऊल का उचलले?

SCROLL FOR NEXT