Rathi Karthigesu Passes Away Twitter
मनोरंजन बातम्या

Rathi Karthigesu Dies: सुप्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगनाचं वयाच्या ८७ व्या वर्षी निधन, सिनेसृष्टीवर शोककळा

Rathi Karthigesu Death: सिंगापूरच्या प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय नृत्यांगना राठी कार्थिगेसू यांची प्राणज्योत मालवली आहे.

Chetan Bodke

Rathi Karthigesu Passes Away: मनोरंजनसृष्टीतून एक दु:खद बातमी येत आहे, सिंगापूरच्या प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय नृत्यांगना राठी कार्थिगेसू (Rathi Karthigesu Dies) यांची प्राणज्योत मालवली आहे. त्यांनी ८७ व्या वर्षाी अखेरचा श्वास घेतला. सिंगापूरमधील एका प्रभावशाली कुटुंबातून रथी यांचा जन्म झाला. प्रसिद्ध नृत्यांगना राठी यांच्या पश्चात मुलगा आनंद कार्थिगेसू आहे. तो पेशाने वकील आहे.

राठी यांनी भरतनाट्यम तज्ञ आणि सिंगापूरमधील प्रसिद्ध न्यायाधीशांपैकी एक असलेल्या मुतांबी कार्थिगेसू सोबत लग्नगाठ बांधली होती. राठी यांच्या पतीचे निधन १९९९ मध्ये वयाच्या ७५ व्या वर्षी प्राणज्योत मालवली. राठी एका दु:खातून सावरतात किंवा ना सावरतात, तोच त्यांच्यावर दुसरा दु:खाचा डोंगर कोसळला. पतीच्या निधनानंतर अवघ्या आठवड्यातच राठीच्या मुलीचे निधन झाले.

२००६ मध्ये राठी यांच्या ४८ वर्षीय मुलाचे देखील निधन झाले. मुलगा सुरेशनच्या निधनामुळे राठी यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. कार्थिगेसु या माजी ज्येष्ठ मंत्री आणि राष्ट्रपतीपदाचे उमेदवार थर्मन षणमुगररत्नम यांच्या काकू होत्या. त्यांचा भाऊ माजी खासदार पी. सेल्वादुराई आहे.

माजी खासदार सेल्वादुराई यांनी २००१ मध्ये एका इंग्रजी संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, शास्त्रीय भारतीय कलेचा प्रचार आणि आवड निर्माण करण्यात राठी यांचा प्रभाव असल्याचा त्यांनी उल्लेख केला होता.

सेल्वादुराई यांनी 2001 मध्ये द संडे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत, जगभरात शास्त्रीय भारतीय कलेचा प्रचार आणि लोकांमध्ये आवड निर्माण करण्यात राठी यांचा मोलाचा वाटा असल्याचा उल्लेख त्यांनी मुलाखतीत केला होता. सिंगापूर इंडियन फाइन आर्ट्स सोसायटी (सीआयएफएएस) ने राठी यांना ट्वीटरच्या माध्यमातून ट्वीट करत श्रद्धांजली वाहिली. राठी यांनी यांनी काही काळ या सोसायटीच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी देखील सांभाळली होती.

एकंदरीतच आधी पती जाण्याचं दु:ख नंतर मुलाचं आणि मुलीच्या निधनामुळे देखील त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. त्यांच्यावर एका मागुन एक कौटुंबिक आघात होत गेले. आज त्यांचंही निधन झालं. रथी यांच्या निधनामुळे भरतनाट्यम कलेतला मोठा तारा निखळला, अशा भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT