Siddhu Moose Wala  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sidhu Moosewala's Chorni Released : मृत्यूनंतर सिद्धू मुसेवालाचे चौथे गाणे प्रदर्शित

Divine New Song : डिव्हाईनने सिद्धूला श्रद्धांजली वाहिली आहे.

Pooja Dange

Sidhu Moose Wala and Divine’s song Chorni Out : पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर 'चोरनी' हे त्याचे चौथे गाणे प्रदर्शित झाले आहे. रॅपर डिवाइनने हे गाणे प्रदर्शित केले आहे. या गाण्याला यू ट्यूबवर २१.५ मिलियन व्ह्यूज आतापर्यंत (बातमी प्रसिद्ध केली तेव्हा )मिळाले आहेत.

सिद्धू मुसेवालाची जुनी शैली नव्या गाण्यात पाहायला मिळते. या गाण्याच्या व्हिडिओमध्ये व्हीएफएक्सचा वापर करण्यात आला आहे. तसेच आपल्याला सिद्धू मुसेवाला देखील या गाण्यामध्ये पाहायला मिळत आहे. हे गाणे मुंबईत शहरावर आधारित आहे. (Latest Entertainment News)

वादात सापडल्यानंतर सरकारने SYL गाण्यावर बंदी घातली होती. मुसेवालाचे तिसरे गाणे 'मेरा ना' 7 एप्रिल 2023 रोजी लाँच झाले. ज्याला एका तासात 20 लाख व्ह्यूज मिळाले आणि 7 लाख लोकांनी गाणे लाइक केले आणि 1.5 लाख कमेंट्स केल्या होत्या.

चोरनी या गाण्यातील त्याच्या रॅपमध्ये, डिव्हाईनने सिद्धूला श्रद्धांजली वाहिली आहे. सिद्धू यांच्याकडून खरा हिप-हॉप शिकला. या गाण्यात दिवंगत दिग्गज गायिका (Singer) लता मंगेशकर यांच्या चोरनी हू मैं या गाण्याचा वापर केला आहे.

सिद्धू मुसेवालाचे नवीन गाणे नवकरण ब्रारने दिग्दर्शित आणि एडिट केले आहे. तर डिव्हाईन या गाण्यात रॅप गायला आहे. व्हीएफएक्स आणि मोशन ग्राफिक्सचा वापर करून गाण्यामध्ये सिद्धू मुसेवालाल या गाण्यात जीवदान दिल आहे.

मुसेवाल्याच्या चाहत्यांना या यामुळे खूप आनंदी आहेत. कमेंट करून सिद्धू मुसेवाला अमर आहे असे सांगत आहेत. तसेच डिव्हाईनने गाण्याला न्याय दिला असल्याचे देखील म्हणत आहेत.

पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांची 29 मे 2022 रोजी पंजाबच्या मानसा जिल्ह्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. चोरनी हे त्यांचे चौथे मरणोत्तर-रिलीज झालेले गाणे आहे. 

जून 2022 मध्ये, त्याच्या मृत्यूच्या जवळपास एक महिन्यानंतर, SYL हे गाणे रिलीज झाले होते परंतु नंतर ते व्हिडिओ प्लॅटफॉर्मवर ब्लॉक करण्यात आले होते. नोव्हेंबरमध्ये वार हे गाणे रिलीज झाले. त्याचा शेवटचा रिलीज होता मेरा ना. या वर्षी एप्रिलमध्ये रिलीज झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Soft Glam Makeup: सणासुदी ते लग्नसराईपर्यंत ट्राय करा सॉफ्ट ग्लॅम मेकअप; दिसाल सगळ्यात सुंदर आणि आकर्षक!

Maharashtra News Live Update: जालन्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चटणी-भाकर खाऊन सरकारचा निषेध

Pune Hapus Price: फळांचा राजा पुण्यात दाखल, हापूस आंब्याची १ पेटी ४१,००० रुपयांना

Jio Offers : जिओचा नवा रिचार्ज प्लॅन लॉन्च! तब्बल ३ वर्ष चालणार, अनलिमिटेड कॉलिंग, डेटा अन् भरपूर फायदे; किंमतही समोर

Investment Fraud: गवंडी काम करणाऱ्या व्यक्तीने रचला ६७० कोटींचा महाघोटाळा; ७४०० लोकांना लावला लाखांचा चुना, बिंग कसं फुटलं?

SCROLL FOR NEXT