Shyamchi Aai Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shyamchi Aai Teaser: 'श्यामची आई' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित; दिवाळीत येतोय भेटीला

Shyamchi Aai Movie :मराठी चित्रपटसृष्टीत अनेक बायोपिक प्रदर्शित झाले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Shyamchi Aai Movie Teaser:

मराठी चित्रपटसृष्टीत अनेक बायोपिक प्रदर्शित झाले आहेत. अनेक मोठ्या व्यक्तींचे आयुष्य मोठ्या पडद्यावर दाखवण्यात आले आहे. असाच साने गुरुजींच्या आयुष्यावरील बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'श्यामची आई' या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्याचसोबत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.

साने गुरुजींच्या आयुष्यावरील हा चित्रपट ब्लॅक अॅण्ड व्हाईट काळातील अनुभव देणारा आहे. चित्रपटाचा टीझर सर्वांनाच त्या गोल्डन एरात घेऊन जाणारा आहे.

टीझरमध्ये संपूर्ण साने कुटुंबिय एकत्र उभे असल्याचे दिसत आहे. फॅमिली फोटोसोठी हे सर्वजण पोझ देत आहे. हा टीझर संपूर्णपणे ब्लॅक अॅण्ड व्हाईट आहे. त्यामुळे त्या काळात गेल्यासारखा भास होत आहे. टीझर सुरु होताच 'भरजरी गं पितांबर' हे गाण सुरु होतं. हे गाणे त्या काळात गेल्यासारखा अनुभव देत आहे.

'श्यामची आई' चित्रपटाचा टीझर पाहताच अनेक वर्षांपूर्वीचा काळ डोळ्यांसमोर उभा राहतो. साने गुरुजींच्या आयुष्यावरचा हा बायोपिक त्यांच्या आयुष्यातील सर्व रहस्य उलगडणारा आहे. त्यामुळे साने गुरुजींची कथा मोठ्या पडद्यावर पहिल्यांदा दिसणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शणाची घोषणा करण्यात आली आहे. दिवाळीच्या शूभमुहूर्तावर १० नोव्हेंबरला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

चित्रपटात साने गुरुजींची भूमिका ओम भूतकर साकरणार आहे. याचसोबत गौरी देशपांडे, शर्व गाडगीळ, संदीप पाठक, ज्योती चांदेकर, सारंग साठ्ये, उर्मिला जगतार, अक्षया गुरव, दिशा काटकर, मयुर मोरे, गंधार जोशी, अनिकेत सागवेकर हे कलाकार दिसणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

Kareena Kapoor Pregnancy: तिसऱ्यांदा गुड न्यूज देणार करीना कपूर? व्हायरल व्हिडिओने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

SCROLL FOR NEXT