Shraddha Kapoor Love Life SAAM TV
मनोरंजन बातम्या

Shraddha Kapoor: श्रद्धा कपूरच्या लव्ह लाईफबद्दल माहितेय? डोंगरावर केलं होतं प्रपोज, I Love You ऐकून अभिनेत्यानं ठोकली होती धूम!

Shraddha Kapoor Love-life: सध्या श्रद्धा कपूरला 'स्त्री २' मुळे खूप प्रसिद्धी मिळत आहे. 'स्त्री २' बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई करत आहे. अशात आज स्त्री फेम श्रद्धा कपूरच्या लव्ह लाईफ विषयी जाणून घेऊयात. स्त्रीच पहिलं प्रेम 'हा' बॉलिवूडचा अभिनेता होता.

Shreya Maskar

Bollywood Actress Shraddha Kapoor Love Life: बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री श्रद्धा कपूरला (Shraddha Kapoor) सध्या प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळत आहे. ‘आशिकी गर्ल’ ही बॉलिवूडची सरळ, साधी अभिनेत्री आहे. श्रद्धा कपूर उत्कृष्ट अभिनेत्री, खलनायका तसेच कमालीची गायिका देखील आहे. श्रद्धा कपूरने ‘तीन पत्ती’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. बॉलिवूडच्या अनेक दिग्गज अभिनेत्यासोबत श्रद्धाने काम केले आहे. 'आशिकी २' मुळे श्रद्धा रातोरात प्रसिद्धीच्या झोकात आली. 'आशिकी २' ब्लॉकबस्टर हिट ठरला. यानंतर श्रद्धाने अनेक हिट चित्रपट दिले. एक व्हिलन, हैदर, एबीसीडी २, बागी, छिछोरे,स्त्री आणि आता स्त्री २ या चित्रपटातून श्रद्धाने आपल्या जबरदस्त अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. तिच्या दमदार भूमिकांवर चाहते घायाळ आहेत.

श्रद्धा कपूर कोणत्या बॉलिवूड अभिनेत्याच्या प्रेमात?

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि वरुण धवन (Varun Dhawan) दोघेही एकाच शाळेमध्ये शिकले आहेत. बालपणी श्रद्धाचा वरुण क्रश होता. श्रद्धाने वरुणला प्रपोज देखील केले होते. वरुण आणि श्रद्धा मुंबईच्या बॉम्बे स्कॉटिश स्कूलमध्ये एकत्र होते. आजही श्रद्धा-वरुण खूप चांगले मित्र आहेत. शाळेत वयाच्या आठव्या वर्षी स्कूल पिकनिक दरम्याने श्रद्धाने वरुणला प्रपोज केले. 'ABCD2' च्या प्रमोशनदरम्यान वरुणने सांगितले होते की, त्याला देखील लहानपणापासून श्रद्धा खूप आवडते, परंतु त्याने कधीही आपल्या भावना व्यक्त केल्या नाहीत. 'ABCD 2' आणि 'स्ट्रीट डान्सर 3D' या चित्रपटांमधून प्रेक्षकांना श्रद्धा-वरुणची भन्नाट केमिस्ट्री पाहायला मिळाली.

श्रद्धाने वरुणला रोमँटिक पद्धतीने आपल प्रेम व्यक्त केल होत. वरुण-श्रद्धा शूटवर गेलेले असताना डोंगराच्या शिखरावर पोहचून श्रद्धाने वरुणला प्रपोज केले होते. एका मुलाखतीत श्रद्धा सांगितले की, 'तेव्हा आम्ही आठ वर्षांचे होतो. तेव्हा मला वरुण खूप क्यूट वाटला. तो माझा क्रश होता. म्हणून एक दिवस मी तिला प्रपोज (Proposed) केलं. मात्र त्यांनी मला नकार दिला. श्रद्धाने मजेशीर पद्धतीने वरुणला प्रपोज केला होता. त्या दिवशी मी वरुणकडे गेली आणि त्याला माझे बोलणे लक्षपूर्वक ऐकण्यास सांगितले. यानंतर श्रद्धा वरुणला म्हणाली, 'आई लव यू' बोलण्या ऐवजी 'यू- लव- आई' असे बोली. मात्र गंमत म्हणजे वरुणला हे काहीच कळले नाही आणि तो 'नाही' असे उत्तर देऊन तेथून पळ काढली.

श्रद्धा कपूर लव्ह लाईफ

श्रद्धा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असते. सध्या सोशल मीडिया स्त्री २ च्या चर्चेसोबतच श्रद्धाच्या ब्रेकअपची देखील चर्चा रंगली आहे. अलिकडेच स्वतः श्रद्धाने इन्स्टाग्राम स्टोरीवर राहुलसोबतचा (Rahul Mody ) एक फोटो शेअर केला होता. यामध्ये ते एकत्र एन्जॉय करताना दिसत होते. पण आता या दोघांचे ब्रेकअप झाल्याची चर्चा होत आहे. मात्र अद्याप श्रद्धा किंवा राहुल यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. नुकतेच श्रद्धाने राहुल मोदींना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले आहे.

वरुण धवन लव्ह लाईफ

वरुणने आजवर अनेक हिट सिनेमे त्यांच्या ॲक्शन, कॉमेडी आणि गुड लुकिंगचे चाहते दिवाने आहेत. 2012 मध्ये करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द इअर' चित्रपटातून वरुणने सिनेसृष्टीत पदार्पण केले. वरुण धवन 2021 मध्ये त्याची मैत्रीण नताशा दलालसोबत (Natasha Dalal) 2021 मध्ये लग्नगाठ बांधली. नताशाने जून २०२४मध्ये सुंदर मुलीला जन्म दिला. वरुण-नताशा दोघेही आपल्या नात्यात खूप खुश असताना पाहायला मिळतात.

'स्त्री-२'चा बॉक्स ऑफिसवर जलवा

श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांचा 'स्त्री 2' प्रेक्षकांच्या मनावर जादू केली आहे. दिवसेंदिवस यांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये वाढ होताना पाहायला मिळत आहे. 'स्त्री-२' ने आजवर बंपर कमाई केली आहे. राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरच्या स्त्री 2 ने बॉक्स ऑफिसवर 700 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. 'स्त्री-२' च्या यशाचा आनंद लुटताना श्रद्धा पाहायला मिळत आहे. या हॉरर कॉमेडी चित्रपटात श्रद्धा कपूर आणि राजकुमार रावसोबत कलाकर पंकज त्रिपाठी, अभिषेक बॅनर्जी आणि अपारशक्ती खुराना यांचा ही भन्नाट अभिनय पाहायला मिळत आहे.

श्रद्धा कपूर इंस्टाग्राम

श्रद्धा कपूरला 'स्त्री २' च्या यशासोबतच इन्स्टाग्रामवर देखील भरपूर प्रेम मिळत आहे. यामुळे तिने इन्स्टाग्रामवर देखील रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे. आता श्रद्धाने इन्स्टाग्राम फॉलोअर्सच्या बाबतीत बॉलिवूड-हॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रालाही मागे टाकले आहे. इन्स्टाग्रामवर श्रद्धाचे 92.7 मिलियन फॉलोअर्स आहेत. तर प्रियांका चोप्राचे इन्स्टाग्रामवर 91.9 मिलियन फॉलोअर्स आहेत. 'स्त्री २' ने श्रद्धाला भरभरून प्रेम दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Bhasha Vijaya Divas: 'एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठीत, आता आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देणार'; उद्धव ठाकरेंकडून युतीचे संकेत

Raj thackeray: आम्ही शांत आहोत, म्हणजे आम्ही #$@डू आहोत असा गैरसमज नको, राज ठाकरे कडाडले

Marathi bhasha Vijay Live Updates : तुमच्याकडे न्याय मिळत नसेल तर गुंडगिरी करू, ठाकरेंचा फडणवीसांना टोला

Garja Maharashtra Maza : ठाकरेंच्या मेळाव्याची गर्जा महाराष्ट्र गीताने सुरूवात | VIDEO

Rava Puri Recipe : टिफीनमध्ये रोज चपाती कशाला? झटपट करा कुरकुरीत बटाटा पुरीचा नाश्ता

SCROLL FOR NEXT