Pushpa 2 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Pushpa 2: ना दिशा पटानी ना तृप्ती डिमरी, कोण करणार अल्लू अर्जुनसोबत रोमान्स? 'या' अभिनेत्रीची लागली वर्णी

Pushpa 2 The Rule Movie : 'पुष्पा २ : द रुल' या चित्रपटात बॉलिवूडच्या अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. कोण आहे ती अभिनेत्री जी अल्लू अर्जुनसोबत दिसणार जाणून घ्या.

Shreya Maskar

'पुष्पा २ : द रुल' (Pushpa 2 : The Rule Movie) या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. अल्लू अर्जुनचा चित्रपट बॉक्स ऑफीस गाजवायला सज्ज आहे. 'पुष्पा २ : द रुल' हा चित्रपट 6 डिसेंबर 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुन (Allu Arjun) , रश्मिका मंदान्ना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, 'स्त्री' म्हणजे सर्वांची लाडकी श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) 'पुष्पा २ : द रुल' या चित्रपटात आयटम साँग करताना पाहायला मिळणार आहे. श्रद्धा कपूर आता दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनसोबत रोमँटिक अंदाजात पाहायला मिळणार आहे. खूप दिवसांपासून याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. या आधी चित्रपटाच्या निर्मात्यांनी दिशा पटनी किंवा तृप्ती डिमरीला आयटम साँगसाठी कास्ट करण्याचे ठरवले होते. मात्र 'स्त्री 2' च्या यशानंतर आता ही सुवर्णसंधी श्रद्धा कपूरला मिळत आहे. श्रद्धाचा 'स्त्री 2'ने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली आहे.

या आधी झालेल्या 'पुष्पा' या चित्रपटात समंथा प्रभूने आयटम साँग केले होते. 'पुष्पा' चित्रपटाने जगभरात धुमाकूळ घातला होता. तसेच या चित्रपटाला अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, 'पुष्पा २' चित्रपटाचे अधिकार 650 कोटींना विकले गेले आहेत. नेटफ्लिक्सने 'पुष्पा २' चित्रपटाचे अधिकार 270 कोटी रुपयांना विकत घेतले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT