shivali and shraamesh Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shivali Parab Reel: 'सुबह से शाम तक...'; कल्याणची चुलबुली पडली श्रमेषच्या प्रेमात? व्हिडीओ व्हायरल

Shivali Parab New Post: आपल्या कॉमडीमुळे नेहमीच चर्चेत राहणारी शिवाली सध्या तिच्या आणि श्रमेषच्या एका नव्या रिलमुळे चर्चेत आली आहे.

Shruti Vilas Kadam

Shivali Parab: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या सोनी मराठीच्या कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहचलेल्या अभिनेत्री शिवाली परबचा फार मोठा चाहतावर्ग आहे. हास्यजत्रेमधून शिवालीला ‘कल्याणची चुलबुली’ या नावाने ओळख मिळाली. आपल्या कॉमडीमुळे नेहमीच चर्चेत राहणारी शिवाली सध्या एका रिलमुळे चर्चेत आली आहे. शिवालीने अभिनेता श्रमेष बेटकरसोबत एक सुंदर अशी रील सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. या रिलमध्ये आलेल्या कमेंट्समुळे अभिनेत्री सध्या चर्चेतआहे.

या नव्या रीलमध्ये शिवली आणि श्रमेष 'चालबाज' या चित्रपटातील सुबह से शाम तक यह दिल या गाण्यावर सुंदर असे एक्सप्रेशन देत आहेत. या गाण्यावर रील तयार करताना दोघेही एकमेकांकडे प्रेमाने पाहत आहेत. त्यांची ही रील सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहेत.

या त्यांच्या रीलवर वेगवेगळ्या कमेंट येत आहेत. काही त्यांच्या चाहते ही रील बघून त्यांची जोडी लावण्याचा प्रयत्न करत आहेत. एका फॅनने विचारले शिवली तू प्रेमात पडलीयेस हे खरे आहे का? आणि तर एक फिमेल फॅन म्हणाली मला धोका दिलाय श्रमेष तर एकाने मस्त जोडी बोलून या दोघांचे कौतुक केले आहे.

शिवाली परबच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून शिवाली परब प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. शिवालीने ‘चंद्रमुखी’ चित्रपटामध्ये छोट्या चंद्राचे पात्र साकारले होते. त्यानंतर तिचा पाणीपुरी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तसेच शिवली थेट मंगला या तिच्या चित्रपटासाठी आणि त्याच्या विषयासाठी चर्चेत होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मंत्रालय परिसरात झाडाची फांदी पडून पोलीस कॉन्स्टेबल जखमी

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या ३ सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार, 'वीकेंड का वार'ला कोण जाणार घराबाहेर?

Aadhaar Card Update : आधार कार्डधारकांसाठी मोठी बातमी! UIDAIने बदलली Face Authenticationची पद्धत, असा होणार फायदा

Gold Rate : गणेशोत्सवात सोनं खरेदीदारांना दिलासा! १० तोळे ९२०० रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22k, 24k, 18k चे आजचे ताजे दर

Chocolate Modak vs Mawa Modak: चॉकलेट मोदक की मावा मोदक? यंदाच्या गणेशोत्सवात लहान मुलांसाठी बनवा हे दोन्ही मोदक

SCROLL FOR NEXT