Shiv Thakare On Casting Couch Instagram @shivthakare9
मनोरंजन बातम्या

Shiv Thakare On Casting Couch: 'एका मॅडमने रात्री ११ वाजता बोलावुन मला...', कास्टिंग काउचबाबत शिवचा धक्कादायक खुलासा

Bigg Boss 16 Fame Shiv Thakare: मुंबईत फक्त मुलीच नाही तर मुलंही घाबरतात असं शिव ठाकरे म्हटले आहे.

Pooja Dange

Shiv Thakare Spoke About His Early Career Days: मराठी 'बिग बॉस २'चा विजेता आणि हिंदी 'बिग बॉस 16'चा उपविजेता शिव ठाकरेने त्याच्या स्वभावाने सर्वांची मने जिंकली आहेत. शिवला महाराष्ट्रातील तसेच भारतातील प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. टास्क आणि घरातील वावर या सगळ्यात शिव अव्व्ल होता. 'बिग बॉस'च्या ट्रॉफीवर जीवापाड प्रेम करणाऱ्या शिवला ती मिळवता आलेली नाही.

शिव ठाकरे सुरुवातीपासूनच रिअॅलिटी शोचा भाग आहे. बिग बॉसच्या आधी तो रोडीजमध्येही दिसला आहे. शिवाला अभिनेता व्हायचे होते. त्यांच्या या स्वप्नाचा त्याने अनेकदा उल्लेख केला आहे. मुंबईच्या रस्त्यांवर त्याला त्याच्या चित्रपटांचे मोठ-मोठे पाहायचे आहेत. या सर्व गोष्टी त्याने बिग बॉसच्या घरात सांगितल्या.

शिव ठाकरे खूप बिनधास्त आहे. दरम्यान शिवला कास्टिंग काउचबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्याने दिलेल्या उत्तराने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

मुंबईत फक्त मुलीच नाही तर मुलंही घाबरतात असं शिव ठाकरे म्हटले आहे. किंबहुना, एक जुना किस्सा सांगताना शिव म्हणाला, लोकांनी त्याचा वापर केला आहे. काहींनी पैशासाठी तर काहींनी शारीरिकबाबतीत त्याचा वापर केल्याचे शिवणे सांगितले आहे.

शिवने सांगितले की, एक मॅडम होती जी त्याला रात्री 11 वाजता तिच्या घरी बोलवायची. शिव म्हणाला, 'रात्रीचे ऑडिशन कसे होतात हे न समजण्या इतका मी भोळा नव्हतो. नंतर त्या मॅडमने शिवाला काम न देण्याची धमकीही दिली.

शिव ठाकरे अनेकवेळा अशा संकटात अडकला, पण त्याने या परिस्थितीतून स्वतःला सावरले. शिव ठाकरे पुढे म्हणाले की, एकदा तो ऑडिशनसाठी आराम नगरला गेला होता. जिथे त्याला बाथरूममध्ये नेले आणि सांगितले की हे मसाज सेंटर आहे. त्याला काही कळत नव्हते. शिवने सांगितले की, मी काही सलमान खान नाही, पण कास्टिंग काउचच्या बाबतीत स्त्री-पुरुषांमध्ये फरक केला जात नाही, हे त्याला तेव्हा कळले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: केसांचे नुकसान टाळायचंय? मग 'या' गोष्टी आजपासूनच बंद करा

Sun Transit 2025: आजपासून या राशींचं नशीब पालटणार; 12 वर्षांनी सूर्य करणार गुरुच्या नक्षत्रात प्रवेश

Sunday Horoscope : भगवान विठ्ठलाची उपासना लाभदायी ठरेल; ५ राशींच्या लोकांचा दिवस आनंदी जाणार

Maharashtra Politics : राज्याचं राजकीय समीकरण बदललं, 'ठाकरे'च विरोधी पक्षाचा चेहरा? VIDEO

Maharashtra Politics : १८ वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं काय होणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT