Shilpa Shetty  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Shilpa Shetty : शिल्पा शेट्टीचं चाहत्यांना चॅलेंज, वर्कआऊटचा VIDEO केला शेअर

Shilpa Shetty Workout Challenge : शिल्पा शेट्टीने सोशल मीडियावर वर्कआऊट करतानाचा व्हिडीओ शेअर करून चाहत्यांना फिटनेस चॅलेंज दिले आहे. ज्याचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.

Shreya Maskar

शिल्पा शेट्टी कायम फिटनेसमुळे चर्चेत असते.

शिल्पा शेट्टीने चाहत्यांना फिटनेस चॅलेंज दिले आहे.

शिल्पा शेट्टीच्या सौंदर्याचे लाखो चाहते दिवाने आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) कायम तिच्या फिटनेसमुळे चर्चेत असते. वयाच्या 50व्या वर्षी देखील शिल्पा फिट आणि सुंदर दिसत आहे. तिच्या सौंदर्याचे तर लाखो चाहते दिवाने आहेत. शिल्पा शेट्टी एक निरोगी जीवनशैली जगत आहे. अलिकडेच तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिने चाहत्यांना फिटनेस संबंधित एक चॅलेंज दिले आहे.

शिल्पा शेट्टीने व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना मोबिलिटी मूव्ह चॅलेंज (Mobility Move Challenge) दिले आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या चॅलेंजमध्ये हातांचा आधार घ्यायचा नाही. शिल्पा हातांच्या आधाराशिवाय एका खास पद्धतीने तिची कंबर जमिनीवर स्पर्श करते आणि हातांचा वापर न करता पुन्हा उठते. मोबिलिटी मूव्ह चॅलेंजमधून शरीराची ताकद आणि लवचिकता समजते.

शिल्पा शेट्टीने केलेल्या मोबिलिटी मूव्हचे नाव 'हिप्स डोन्ट लाई' (Hips don’t lie) आहे. हे केल्याने शरीराची मुद्रा सुधारते. कंबर आणि शरीराची हालचाल वाढते. कंबर, घोटे, मांडीचे स्नायू उघडण्यास मदत होते. जे बहुतेकदा जास्त वेळ बसून किंवा ताणतणावामुळे आकुंचन पावतात. सांध्याचे आरोग्य सुधारते. शिल्पा शेट्टीच्या या व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. तसेच प्रेक्षक तिच्या फिटनेसचे कौतुक करत आहेत.

शिल्पा शेट्टी कायम आपल्या फिटनेस संबंधित व्हिडीओ शेअर करत असते. ती आपल्या डाएटकडे देखील खूप लक्ष देते. यामुळेच आज 50व्या वर्षी देखील ती खूप बोल्ड आणि ब्युटिफूल दिसते. ती सांगते की, सर्व वयोगटातील लोक योग्य शरीर हालचाली, व्यायामाने तंदुरुस्त आणि उत्साही राहू शकतात. शिल्पा शेट्टीचे चाहते आता तिच्या आगामी प्रोजेक्टची आतुरतेने वाट पाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपूरमध्ये ट्रॅक्टर पुलावरून नदीत कोसळला, एकाचा जागीच मृत्यू

Child growth: मुलाची उंची आणि वजन योग्य आहे का? या महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास वाढीवर होऊ शकतो परिणाम

Thackeray Vs Shinde : ठाकरेंना शिंदेंचा झटका; आता 'सोशल' स्ट्राइक, मुंबईसह महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी शिंदेसेनेत

India Fort : किल्ल्यातच वसलंय अर्ध शहर, जगातील 'हे' अनोखं ऐतिहासिक ठिकाण पाहिलंय का?

Online Rent Agreement : घरमालक आणि भाडेकरूंनी ऑनलाइन भाडेकरार कसा करावा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

SCROLL FOR NEXT