Shilpa Shetty Look Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shilpa Shetty Look : ही तर नव्वदच्या दशकातील बार्बी! शिल्पा शेट्टीचा हॉट पिंक साडीतील लूक व्हायरल

Shilpa Shetty New Look : शिल्पा शेट्टीचा नवीन लूक सध्या चर्चेत आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Shilpa Shetty Barbie Look

बॉलिवूडची धडकन म्हणून अभिनेत्री शिल्पा शेट्टी ओळखली जाते. शिल्पा शेट्टी ही नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. शिल्पा शेट्टी सध्या तिच्या नवीन चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याचदरम्यानचा तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शिल्पा शेट्टी तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते. ती नेहमी तिच्या नवनवीन लूकमुळे चाहत्यांची मने जिंकत असते. सर्वजण तिच्या स्टाईलवर फिदा असतात. अनेकदा तिच्या स्टाईलचे ड्रेस मुली परिधान करण्याचा प्रयत्न करत असतात. असाच एक तिचा हटके लूक सध्या चर्चेत आला आहे.

शिल्पा शेट्टी आज पापाराझीसमोर स्पॉट झाली. यावेळी तिने गुलाबी रंगाची साडी नेसली होती. त्यावर तिने बस्टियर ब्लाऊज अन् हाताला स्लिव्हस लावले आहेत. गुलाबी रंगाच्या दागिन्यांमध्ये शिल्पा खूप सुंदर दिसत आहे. तिच्या या वेगळ्या लूकवर सगळेच घायाळ झाले आहेत.

शिल्पाला या लूकमध्ये 'देसी बार्बी' म्हणायला हरकत नाही. गुलाबी रंगाच्या या साडीमध्ये ती एखाद्या बार्बीपेक्षा कमी दिसत नाही. शिल्पाने शिफॉनची साडी नेसली आहे. त्यामुळे शिफॉन आणि बार्बी लूकचा वेगळाच मिलाप पाहायला मिळत आहे. त्यामुळे तिला ९० च्या दशकातील बार्बी म्हणायला हवं.

शिल्पाच्या या लूकवर नेटकऱ्यांनी कमालीच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. सर्वांना तिचा हा हटके लूक आवडला आहे. व्हिडिओमध्ये तिला अनेकजण बार्बी आणि सुखी म्हणताना दिसत आहे. तिच्या या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

शिल्पाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, शिल्पा लवकरच एका नवीन अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शिल्पा 'सुखी' या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात ती एका गृहीणीची भूमिका साकारत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिवसेना आमदाराच्या पत्नीसमोर चित्रलेखा पाटील म्हणाल्या ५० खोके...; सुरूवातीला बाचाबाची नंतर धक्काबुक्की; VIDEO व्हायरल

Ban Online Betting Games: मोदी सरकारचा आणखी एक स्ट्राईक; ऑनलाइन बेटिंग गेम्सवर आणणार बंदी

Crime: दारूच्या नशेत बायकोवर कुऱ्हाडीने वार, नंतर धावत्या ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या; जळगाव हादरले

Maharashtra Rain: राज्यात पावसाचे धुमशान! रेल्वेसेवेला मोठा फटका, २०-२१ ऑगस्टला लांबपल्ल्याच्या ट्रेन्स रद्द; वाचा लिस्ट

Maharashtra Rain Live News: मुंबईसाठी उद्या पावसाचा ऑरेंज अलर्ट, शाळां-महाविद्यालयांच्या सुट्टीबाबत अद्याप निर्णय नाही: BMC

SCROLL FOR NEXT