Shefali Jariwala Parag Tyagi x
मनोरंजन बातम्या

Shefali Jariwala : शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर पती पराग त्यागीची पोलिसांनी केली होती चौकशी; पण...

Shefali Jariwala Parag Tyagi : २७ जून २०२५ रोजी अभिनेत्री शेफाली जरीवालाचे निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात होते. पण वेगळ्याच कारणामुळे शेफालीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

Yash Shirke

Shefali Jariwala News : अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या मृत्यूने सर्वांना धक्का बसला आहे. २७ जूनच्या रात्री ४२ वर्षीय शेफाली जरीवालाचा मृत्यू झाला. सुरुवातीला तिचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे म्हटले जात होते. त्यानंतर पोलीस आणि फॉरेन्सिक टीमने शेफालीच्या घरी तपास केला. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

पोलिसांच्या तपासात शेफालीच्या मृत्यूबाबत अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. तिने फ्रीजमधील शिळे अन्न खाल्ले होते. त्यानंतर ती खाली पडली असा जबाब तिचा पती पराग त्यागीने पोलिसांकडे नोंदवला. शेफाली जरीवालाच्या घरी एंटी एजिंग गोळ्या आणि व्हिटॅमिनच्या गोळ्या असलेले दोन बॉक्स सापडले होते. डॉक्टरांच्या सल्लाशिवाय ती गोळ्या घेत होती. पण याचा तिला कोणताही त्रास झाला नव्हता, असे तिच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे.

शेफालीशी संबंधित प्रत्येक व्यक्तीची पोलिसांनी चौकशी केली. कुटुंबियांपासून घरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही चौकशी करण्यात आली. शेफालीच्या पतीला, पराग त्यागीला देखील चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. 'ज्या दिवशी शैफालीचा मृत्यू झाला, त्याच दिवशी तिचा पती परागची चौकशी करण्यात आली. त्यावेळी मी खूप घाबरुन गेले होते', असे वक्तव्य शेफालीची मैत्रीण पूजा घईने म्हटले.

'परागकडे शोक करायलाही वेळ नव्हता. तो सतत पोलिसांच्या रडारवर होता. ज्याक्षणी मी परागला पाहिले, तेव्हा या परिस्थितीतून त्याने लवकरात लवकर बाहेर यावे अशी मी आशा करत होते, सुदैवाने अहवालामध्ये कोणताही गैरप्रकार झाला नाही हे स्पष्ट झाले आणि परागला सोडून देण्यात आले', असे वक्तव्य पूजा घईने केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT