Shahrukh Khan's Mannat Bungalow Nameplate is Trending On Twitter India Saam TV
मनोरंजन बातम्या

शाहरुखच्या मन्नत बंगल्याची नवी नेम प्लेट पाहिली का? ट्विटरवर #Mannat होतंय ट्रेंड

Mannat Bungalow Nameplate is Trending On Twitter : ट्विटरवर अनेकांनी या नव्या नेम प्लेटचे फोटोज् मोठ्या प्रमाणात शेयर केले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: बॉलिवूडचा किंग शाहरुख खान याचं राहतं घर म्हणजे मुंबईत असलेला आलिशाना असा मन्नत बंगला. मुंबईतील (Mumbai) सर्वात महागड्या आणि लक्झरी बंगल्यांपैकी एक असलेला मन्नत बंगला (Mannat Bungalow) हा अनेकांसाठी आकर्षणाचा विषय आहे. याच मन्नत बंगल्यातील गॅलरीमधून शाहरुख (Shahrukh Khan) आपल्या चाहत्यांना झलक देत असतो. त्यामुळे त्याचे चाहते सतत मन्नतकडे लक्ष देऊन असतात. अशाचत आता ट्विटरवर #Mannat हा हॅशटॅग ट्रेंड (Twitter Hashtag Trending) अचानक होत आहे. (Shahrukh Khan's Mannat Bungalow Nameplate is Trending On Twitter India)

हे देखील पाहा -

याचं खरं कारण म्हणजे शाहरुखच्या मन्नत बंगल्याची जूनी नेम प्लेट (फलक) बदलवून नवी नेमप्लेट (Mannat New Nameplate) लावण्यात आली आहे, त्यामुळे ट्विटरवर अनेकांनी या नव्या नेम प्लेटचे फोटोज् मोठ्या प्रमाणात शेयर केले आहेत. परिणामी ट्विटरवर मन्नत हा हॅशटॅग पहिल्या क्रमांकावर ट्रेंड होत आहे. कामाबद्दल बोलायचे झाले तर सध्या शाहरुख खान त्याच्या आगामी 'पठाण' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. पठाण पुढील वर्षी जानेवारीत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहरुखसोबत जॉन अब्राहम आणि दीपिका पदुकोण देखील दिसणार आहेत. तसेच शाहरुख खान राजकुमार हिरानीच्या डंकी या चित्रपटात दिसणार आहे. यानिमित्ताने भारतीय चित्रपटसृष्टीतील दोन मोठे दिग्गज चित्रपट निर्माता राजकुमार हिरानी आणि सुपरस्टार शाहरुख खान पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत.

Edited By : Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : शाळेत ११ वर्षीय विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, मुख्याधापकाचं हैवानी कृत्य उघड

भव्य विसर्जन मिरवणुकीत बाप्पावर फुलांचा वर्षाव; पाहा डोळ्यांची पारणं फेडणारं दृश्य|VIDEO

Anant Chaturdashi 2025 live updates : माजीं खासदरनवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्याकडून गणरायाचे विसर्जन

Marriage Tips : नवरा-बायकोचं नातं तुटण्यापूर्वी व्हा सावध; या गोष्टींमुळे वाढतो घटस्फोटाचा धोका

Ashane Waterfall : रायगडचे सौंदर्य वाढवणारा 'आषाणे' धबधबा, तुम्ही कधी पाहिला का?

SCROLL FOR NEXT