shahrukh khan SaamTv
मनोरंजन बातम्या

VIDEO: शाहरुख खानने मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांसोबत केली मस्करी; सांगितलं कोण आहे खरा बॉस...

बॉलिवूड इंडस्ट्री 'उमंग' या कार्यक्रमाद्वारे मुंबई पोलिसांच्या योगदानासाठी दरवर्षी जल्लोष साजरा केला जातो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Umang 2022 |मुंबई : बॉलिवूड इंडस्ट्री 'उमंग'(Umang) या कार्यक्रमाद्वारे मुंबई पोलिसांच्या योगदानासाठी दरवर्षी जल्लोष साजरा केला जातो. हा कार्यक्रम जून महिन्यामध्ये झाला होता, त्यानंतर शनिवारी, ६ ऑगस्टला हा कार्यक्रम टिव्हीवर प्रसारित झाला. या शोमध्ये शाहरुख खान, भारती सिंगसोबत स्टेजवर कॉमेडी करताना दिसला. या शोची एक क्लिप सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये शाहरुख खान(Shahrukh Khan) मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यावर विनोद करताना दिसत आहे.

व्हिडिओच्या सुरुवातीला शाहरुख खान कॉमेडियन भारती सिंगचा पती हर्ष लिंबाचियासह सर्व स्टार्सची खिल्ली उडवताना दिसत होता. 'आयुक्तांचे सर्व आदेश स्टार्सनी तातडीने ऐकून त्याचे पालन करावे', असे हर्ष म्हणाला. शाहरुख खान त्यावर गंमतीने आयुक्तांच्या पत्नीकडे बोट दाखवत म्हणाला की 'असा एकच बॉस आहे ज्याच्यापुढे आयुक्त संजय पांडे यांनाही नतमस्तक व्हावे लागते'. त्यानंतर शाहरुख खान आणि भारती यांनी मजेदार स्किटमधून आयुक्तांच्या घरातील वातावरणाचे वर्णन करून दाखवले.

दरम्यान, शाहरुख खानने त्याच्या चाहत्यांच्यासाठी, लंडनहून परतल्यावर पापराझींना त्याचे फोटो काढण्याची परवानगी दिली. गेल्या काही आठवड्यांपासून शाहरुख खान तापसी पन्नूसोबत 'डंकी' चित्रपटाचे शूटिंग करत आहे. शाहरुख खानकडे 'पठाण' आणि 'जवान' हे चित्रपट देखील आहेत. 'ब्रह्मास्त्र'मध्येही तो छोट्या भूमिकेत दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मोठी बातमी! ठाकरेंचा दिग्गज नेता आणि नगरसेवकाविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: सोयाबीनचे बियाणे विक्री करणाऱ्या 'बूस्टर' कंपनीविरोधात अमरावतीत गुन्हा

SET Exam Update : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! SET परीक्षा पुढे ढकलली, नेमकं कारण काय? कधी होणार परीक्षा? वाचा A to Z अपडेट्स

Sindhudurg Tourism : मालदीव विसरा! महाराष्ट्रातच आहे 'हा' निसर्गरम्य समुद्रकिनारा, पावसाळ्यात दिसतं आरशासारखं निळेशार पाणी

Salman Khan : सलमान खानने विकले मुंबईतील आलिशान घर; किती कोटींमध्ये झाली डील, आकडा पाहून व्हाल चकित

SCROLL FOR NEXT