Pathan Movie  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Pathan Movie Update: शाहरुख आणि दीपिकाचा सेटवरील फोटो चर्चेत, 'टीझर कधी प्रदर्शित होणार ' चाहत्यांचा प्रश्न

दीपिका आणि शाहरुख चित्रपटातील लूकमध्ये दिसत असून फोटो वाऱ्यासारखा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फिल्मफेअरच्या सोशल मीडिया अकाऊंटवर हा फोटो पोस्ट करण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Pathan Movie: आज अभिनेता शाहरुख खानचा वाढदिवस. गेल्या अनेक दिवसांपासून चाहत्यांच्या मनात त्याच्या 'पठाण' चित्रपटाविषयी उत्सुकता बरीच वाढली आहे. याच वर्षी मार्च महिन्यात चित्रपटाच्या सेटवरील काही खास फोटो व्हायरल झाले होते, तेव्हापासून प्रत्येकाच्या मनात चित्रपटाविषयी उत्सुकता आहे. शाहरुख तब्बल ३ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर झळकणार असल्याने प्रेक्षक चांगलेच उत्सुक आहेत. त्यानंतर काही महिन्यांपुर्वी ‘पठाण’ची घोषणा करण्यात आली. अधिकृतरित्या जॉन अब्राहम, दीपिका पदूकोण आणि शाहरुख खान यांच्या पात्रांची फक्त झलक दाखवली.

सोशल मीडियावर पठाण चित्रपट अजूनही ट्रेंडवर कायम आहे. नेहमीच चित्रपटातील शूटिंग दरम्यानचे काही खास फोटो व्हायरल होत असतात. सेटवरील ते फोटो सोशल मीडियावर बरेच चर्चेत आहेत. दीपिका आणि शाहरुख चित्रपटातील लूकमध्ये दिसत असून फोटो वाऱ्यासारखा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फिल्मफेअरच्या सोशल मीडिया अकाऊंटवर हा फोटो पोस्ट करण्यात आला आहे.

चित्रपटाबाबत गुप्तता बरीच कलाकारांनी पाळलेली दिसत आहे. कलाकार मंडळी आपल्या सेटवरील खास फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात, पण 'पठाण' चित्रपटाबाबात असे काही होताना दिसत नाही.

व्हायरल झालेल्या या फोटोपासून चित्रपटाच्या टीझरची उत्सुकता आणखीच शिगेला पोहोचलेली आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त हा टीझर प्रदर्शित करण्यात येणार असल्याची सोशल मीडियावर चर्चा होत होती. नेटकऱ्यांनी 'पठाण' चित्रपटाचा हॅशटॅगही वापरायला सुरुवात केली आहे.

चित्रपटाच्या टीझर प्रदर्शनाचा निर्णय अजूनही झालेला नाही. त्यामुळे टीझर कधी येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 'पठाण' २५ जानेवारी २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट सिद्धार्थ आनंद यांनी दिग्दर्शित केला असून यातील सलमान खानच्या छोट्याशा भूमिकेचीही चांगलीच चर्चा होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026: गणरायाला मोदक का आवडतात? जाणून घ्या यामागची पौराणिक कथा

Maharashtra News Live Update: जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरून अमोल कोल्हेंचा राज्य सरकारवर निशाणा

बुलढाणा जिल्हा बँकेत नवं समीकरण; अध्यक्षपदी डॉ.राजेंद्र शिंगणेंची निवड, ६५ वर्षांच्या इतिहासात शिंगणे कुटुंबाची ३१ वर्ष सत्ता

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला मिळणार रेल्वेची साथ; नव्या फ्रेट कॉरिडॉरचा मोठा प्लॅन!

SBI Recruitment: बँकेमध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, SBI मध्ये २०७ पदांसाठी भरती; लाखो रुपये मिळवा पगार

SCROLL FOR NEXT