Deepika Padukone Suhana Khan Look Saam Tv
मनोरंजन बातम्या

Suhana Deepika Looks: शाहरुख खानची मुलगी सुहानाचे काय आहे दीपिकाशी नाते, सोशल मीडियावर चर्चांना उधाण...

सुहाना खानची सोशल मीडियावर चर्चा होत असून तिची दीपिकासोबत तुलना केली जात आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: बॉलिवूडमध्ये दिवाळी पार्टीची जोरदार चर्चा सुरू आहे. सेलिब्रिटी एकमेकांच्या दिवाळी पार्टीला जाताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांत ​​क्रिती सेनॉन, तापसी पन्नू आणि आयुष्मान खुरानापासून ते ड्रेस डिझायनर मनीष मल्होत्रा ​​यांनी दिवाळी पार्टीचे आयोजन केले होते. या पार्ट्यांमध्ये सर्व सेलिब्रिटी हॉट आणि ग्लॅमरस लूकमध्ये दिसले होते.

कतरिना कैफ, विकी कौशल, जान्हवी आणि खुशी कपूर, वरुण धवन, क्रिती सेनॉन, माधुरी दीक्षित, सारा अली खान, नोरा फतेही, कियारा अडवाणी, सिद्धार्थ मल्होत्रा, आदित्य रॉय कपूर, अनन्या पांडे, करीना कपूर खान, करण जोहर सगळ्यांनीच दिवाळी पार्टीला हजेरी लावली होती. परंतु सोशल मीडियावर एका स्टारकिडची प्रचंड चर्चा होत आहे ती म्हणजे शाहरुख खानची मुलगी सुहाना खानची.

सुहाना खान अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. यामुळे अलीकडच्या काळात तिनेही फिल्मी पार्टी आणि कार्यक्रमांना उपस्थित राहण्यास सुरुवात केली आहे. मनीष मल्होत्राच्या पार्टीत ती पोहोचताच सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळल्या. तिने सिल्व्हर-गोल्ड कलरची साडी नेसली होती. त्यावर तिने स्लीव्हलेस ब्लाउज घातला होता. (Bollywood)

या साडी लूकमध्ये ती ग्लॅमरस दिसत होती. तिने पापाराझींसमोर पोझ देत तिचा लूक फ्लॉंट केला. मात्र त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर आल्यानंतर चर्चांना उधाण आले. कुणाला सुहानाची स्टाइल आवडली, तर कुणी तिला साडी सांभाळत येत नसल्याचे सांगितले. कुणाला सुहानाची चाल रोबोटसारखी वाटली. (Social Media)

Suhana Khan

सोशल मीडियावर सुहानाची सर्वाधिक चर्चा तिच्या लूकमुळे होत आहे. सुहानाचा लूक अनेकांना दीपिका पदुकोणची आठवण करून देत आहे. यावर अनेकजण आपली मते मांडत आहेत. शाहरुख आणि दीपिकाने चार चित्रपटांमध्ये एकत्र काम केले असून त्यांची जोडी पडद्यावर यशस्वी ठरली आहे. सोशल मीडियावर मनीष मल्होत्राच्या पार्टीमधील सुहानाचे फोटो पाहून एका यूजरने लिहिले की, क्षणभर मला वाटले की, ती दीपिका पदुकोण आहे. एका युजरने सांगितले की, सुहाना एका नजरेत हुबेहूब दीपिकासारखी दिसते. सुहाना आणि दीपिका या दोघीही सुंदर आहेत आणि त्यांना चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांचे प्रेम मिळत राहील. (Deepika Padukone)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nishikant Dubey Anti-Marathi : मराठी माणसाला डिवचा, प्रसिद्धी मिळवा; लालू, अमरसिंहनंतर आला निशिकांत दुबे

Pakistan : पाकिस्तानात होणार सत्तापालट? असीम मुनीर होणार राष्ट्रपती? बिलावल भुट्टोच्या विधानामुळे खळबळ

Russia News : पुतिन यांनी मंत्रिमडळातून काढलं; काही तासांतच मंत्र्याने आयुष्य संपवलं, जगात खळबळ

Shravan Somvar: पहिल्या श्रावण सोमवारी करा 'असे' उपाय, महादेव होतील प्रसन्न

Maharashtra Politics: MIM ने शोधला 'वंचित'ला पर्याय? महाराष्ट्राच्या राजकारणात 'रावण'ची एण्ट्री महाराष्ट्रात 'MD' फॅक्टर किंगमेकर?

SCROLL FOR NEXT