Shahrukh Khan SAAM TV
मनोरंजन बातम्या

Shahrukh Khan : पठाणची धूम थेट दुबईला; आयकॉनिक स्टेपवर थिरकला किंग खान, पाहा VIDEO

Shahrukh Khan Dance Viral : दुबईमध्ये ब्रँड लाँचच्या कार्यक्रमादरम्यान किंग खान पठाणच्या गाण्यावर डान्स करताना दिसला. त्याचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

Shreya Maskar

बॉलिवूडचा किंग खान (Shahrukh Khan ) नेहमीच आपल्या कामाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत असतो. त्याने आजवर अनेक हिट चित्रपट केले आहेत. शाहरुख खानचा पठाण आणि जवान हे दोन्ही चित्रपट खूप गाजले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली. या चित्रपटातील त्याची गाणी खूप हिट झाली आहेत.

शाहरुख खान नुकताच दुबईत एका कार्यक्रमात स्पॉट झाला. हा कार्यक्रम त्याच्या मुलाचा आर्यन खानचा होता. त्यात किंग खान पठाणच्या गाण्यावर थिरकताना पाहायला मिळाला. त्याचा हा डान्स व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. त्याच्या या व्हिडिओवर कमेंट्सचा पाऊस पडत आहे. आर्यन खानच्या लक्झरी स्ट्रीटवेअर ब्रँड D'YAVOL या ब्रँडची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगलेली पाहायला मिळत आहे.

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या (Aryan Khan) स्ट्रीटवेअर ब्रँडच्या लाँचिंगला किंग खान आला होता. हा कार्यक्रम रविवारी दुबईमध्ये पार पडला. खाडी रंगाचा टी शर्ट आणि निळ्या रंगाचा जॅकेट घालून शाहरुख खान डान्स करताना दिसला. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, किंग खान पठाणच्या टायटलट्रॅकच्या सिग्नेचर स्टेप करत आहे. त्याचा डान्स सुरू होताच चाहते ओरडताना पाहायला मिळत आहेत. चाहते खूप खुश होऊन शाहरुख खानला प्रतिसाद देत होते. या ब्रँडच्या लाँच पार्टीला शाहरुखसोबतच अभिनेत्री सुहाना खान, चित्रपट निर्माती गौरी खान देखील पाहायला मिळाली. शाहरुख खानच्या आगामी चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. शाहरुखचा दिलदारपणा चाहत्यांना खूप आवडतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : जय गुजरात; एकनाथ शिंदेंची पुण्यात अमित शहांसमोरच घोषणा

Govindwadi Bypass Bridge : ६ वर्षांतच पुलाची दैना; कल्याणच्या गोविंदवाडी बायपास पुलाच्या कोट्यवधींच्या कामावर प्रश्नचिन्ह

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस गळण्याची समस्या? 'या' टिप्सने घ्या केसांची योग्य काळजी

मराठमोळ्या ठसक्यात तरुणीचा जोरदार डान्स; 'चाळ माझ्या पायांत' गाण्यावर दिला धमाकेदार परफॉर्मन्स

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

SCROLL FOR NEXT