kareena and shahid  Gooogle
मनोरंजन बातम्या

Shahid Kapoor - kareena kapoor : शाहिद आणि करीनाचा फोटो झाला व्हायरल; चाहते म्हणतात 'आमचे गीत - आदित्य...'

Shahid Kapoor - kareena kapoor : अंबानी शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनादिनी काढलेला शाहिद कपूर आणि करीना कपूरचा व्हायरल फोटो पाहून चाहत्यांनी 'जब वी मेट'च्या आठवणींना उजाळा दिला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Shahid Kapoor - kareena kapoor : बॉलीवूडमधील काही कपल असे होते जे वेगळे होऊन अनेक वर्ष झाले तरी त्यांच्या चर्चा आजही रंगलेल्या असतात. असेच एक कपल म्हणजे बॉलीवूडचा कबीर सिंग शाहिद कपूर आणि बेबो करीन कपूर. अनेक वर्षांनी या जुन्या कपला एकत्र बघून चाहते खुश झाले आहेत. गुरुवारी संध्याकाळी मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये वार्षिक दिनाच्या कार्यक्रमासाठी अनेक कलाकारांची गर्दी जमली होती. त्यांच्या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी आलेल्या सेलिब्रिटींमध्ये सैफ अली खानसोबत करीना कपूर, मीरा राजपूतसोबत शाहिद कपूर आणि शाहरुख खान यांच्यासह अनेक प्रसिद्ध कलाकारांचा समावेश होता.

या कार्यक्रमासाठी अभिनेत्री करीना कपूर आणि अभिनेता सैफ अली खान त्यांचा मुलगा तैमूरसोबत आले तेव्हा सर्वांचे लक्ष त्यांनी वेधून घेतले. करिनाची बहीण करिश्मा कपूर देखील या कपलसोबत होती. दरम्यान, अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत देखील या कार्यक्रमात त्यांची मुले मीशा आणि झैनसाठी सहभागी झाले होते.

दरम्यान, सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते म्हणजे कार्यक्रमातील फोटोने जो सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये चाहत्यांनी शाहिद कपूर त्याची एक्स गर्लफ्रेंड करीना कपूरच्या अगदी मागे बसलेला दिसत आहे. या बॉलीवूडमधील प्रसिद्ध एक्स कपलच्या फोटोमुळे इंटरनेटवर खळबळ उडाली.

या फोटोमुळे जब वी मेटच्या चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा जुन्या आठवणी जाग्या झाल्या, या चित्रपटात शाहिद आणि करिनाने गीत आणि आदित्य या भूमिका साकारल्या होत्या. एका चाहत्याने गंमत करत कमेंट केले की, “ते दोघे नेहमीच गीत आणि आदित्य राहतील!” तर, दुसऱ्या चाहत्याने विनोद केला, “गीत आणि आदित्य आता त्यांच्या वेगवेगळ्या जोडीदारांच्या मुलांना पाहत आहेत. आयकॉनिक!” जब वी मेटच्या चित्रीकरणादरम्यान शाहिद कपूर आणि करीना कपूर यांनी डेटिंग केली होती पण चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्यांचे ब्रेकअप झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मध्य रेल्वे धावत्या लोकलमधून महिला पडली

अमृता फडणवीसांकडून जेवणासाठी निमंत्रण; मनोज जरांगेंनी काय उत्तर दिलं? पाहा VIDEO

मी आरक्षण सोडण्यास तयार; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान, पण ठेवली ‘ही’ अट

Main Door Vastu Tips: घराच्या दरवाज्याविषयी 5 महत्वाच्या गोष्टी प्रत्येकाला माहित असायला हव्यात

Ganesh Chaturthi 2026: यंदा गणपती बाप्पांचं आगमन ठरणार विशेष; हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त

SCROLL FOR NEXT