Shahrukh khan and salman khan image
Shahrukh khan and salman khan image Saam Tv
मनोरंजन बातम्या

Tiger 3 : सलमान खानच्या 'टायगर ३' मध्ये होणार शाहरुख खानची एन्ट्री, लवकरच करणार शूटिंगला सुरुवात

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बॉलिवूडचा बादशाहा शाहरुख खान(Shahrukh Khan) सध्या त्याच्या 'जवान' चित्रपटामुळे तूफान चर्चेत आहे, याशिवाय शाहरूख सलमान खानच्या 'टायगर ३'(Tiger 3) चित्रपटाचा भाग देखील आहे.परंतु, बिजी शेड्युलमुळे शाहरूखला चित्रपटाच्या शूटिंगसाठी वेळ काढणे कठीण होत आहे. मात्र आता, किंग खानने 'टायगर ३'च्या शूटिंगसाठी वेळ काढला असून लवकरच तो सलमान खानसोबत शूटिंग करणार असल्याचे बोलले जात आहे.

माहितीनुसर, अभिनेता शाहरूख खान गेल्या काही दिवसांपासून चेन्नईमध्ये आगामी 'जवान' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. मात्र लवकरच तो सलमानच्या 'टाइगर ३' या चित्रपटाच्या मुंबईतील सेटवर उपस्थित राहणार आहे. बॉलिवूडचा दबंग सलमान खान आणि बादशाह शाहरुख खान दोघेंही चित्रपटात एकत्र काम करण्यासाठी तयार आहेत. शाहरूख खान सलमानसोबत 'टायगर ३' चे शूटिंग १० दिवस करणार आहे. ज्यामध्ये शाहरूखचे खास इंट्रो सीन असणार आहेत.मात्र अद्यापही याबाबतचा कोणताही खुलासा करण्यात आला नाही.

माहितीनुसार, सध्या शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. तर सलमान खान'किसी का भाई किसी की जान'च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. किंग खान सलमानच्या 'टायगर ३' चित्रपटात रॉ-ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपटाचा क्लायमॅक्स असेल,त्यानंतर 'टायगर ३'चे शूटिंग पूर्ण होईल. चित्रपटात सलमान खान आणि शाहरूख खानसह कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी देखील मुख्य भूमिकेत आहेत.

मनीष शर्मा दिग्दर्शित 'टायगर ३' हा सलमान खानच्या 'टायगर' चित्रपटाचा सिक्वेल आहे. सलमानच्या 'एक था टायगर'या चित्रपटाचा पहिला भाग आहे. जो २०१२ मध्ये प्रदर्शित झाला होता. पाच वर्षानंतर म्हणजेच २०१७ मध्ये चित्रपटाचा दुसरा भाग 'टायगर जिंदा है'प्रदर्शित झाला.हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले. आता चाहते 'टायगर ३' ची आतुरतेने वाट पाहत आहेत. काही महिन्यांपूर्वी सलमान खानने चित्रपटाशी संबंधित एक टीझर शेअर केला. ज्यामध्ये त्याने चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. पुढीलवर्षी २०२३ ला ईदच्या मुहूर्तावर सलमानचा खानचा 'टायगर ३' प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol Diesel Rate: महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जाहीर, तुमच्या शहरातील आजचा भाव काय? जाणून घ्या

Rajan Vichare News : ठाण्यात बोगस मतदान होणार, राजन विचारे यांचा दावा

Kalyan Election Voting LIVE : डोंबिवली पूर्वेत EVM मशीनमध्ये बिघाड, मतदारांचा खोळंबा

Lok Sabha 2024: भाजप सरकारी यंत्रणेवर दबाव आणून लोकशाही लुटतंय; व्हिडिओ X पोस्ट करत राहुल गांधीचा गंभीर आरोप

Shantigiri Maharaj : शांतिगिरी महाराजांनी मतदानापूर्वी EMV मशीनला घातला फुलांचा हार; VIDEO तुफान व्हायरल

SCROLL FOR NEXT