Shahrukh Khan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shahrukh Khan: शाहरुख खानची तब्येत बिघडली; आजारापणामुळे खात आहे वरण-भात

शाहरुखने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या आजारपणाची बातमी शेअर केली आहे.

Chetan Bodke

Shahrukh Khan: बॉलिवूडचा किंग शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी पठान चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटातील गाण्याला सर्वच स्तरातून त्यांना आता विरोधाचा सामना करावा लागत आहे. 'बेशरम रंग' या गाण्यातील दीपिकाच्या भगव्या रंगाच्या बिकीनीमुळे सर्व हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्याचे म्हटले जात आहे. या गाण्याला आतापर्यंत भरपूर विरोध दर्शवला जात असला तरी त्याला तितकाच पाठिंबाही मिळत असल्याचे दिसून येत आहे.

चित्रपटावर नेटकऱ्यांकडून बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे सध्या शाहरुख खान आणि दीपिका पादुकोणच्या अडचणी वाढल्या असल्याचं दिसत आहे. अशातच शाहरुख खानची प्रकृती ठीक नसल्याचही समोर आलं आहे.

शनिवारी शाहरुखने काही वेळासाठी आस्क मी एनिथिंग (Ask Me Anything) हा सेशन घेतला होता. यावेळी त्याने चाहत्यांनी विचारलेल्या सर्वच प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान त्याने इन्फेक्शनमुळे आजारी असल्याचे सांगितले.

शाहरुख खानच्या तब्येतीचे अपडेट मिळाल्यानंतर त्याचे चाहते चिंता व्यक्त करत असून तो लवकरच बरा होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. शाहरुखला डॉक्टरांनी झालेल्या त्रासामुळे डाएट फॉलो करायला सांगितले आहे. दरम्यान त्याने सांगितले होते की, मला इन्फेक्शनमुळे बरं वाटत नसल्याने मी वरण भात खात आहे. पण त्याने नक्की कशामुळे त्याला इन्फेक्शन झाले, हे स्पष्ट केले नाही.

Shahrukh Khan

शाहरुख खान'पठान' चित्रपटात एजंटच्या भूमिकेत असून त्याच्यासोबत जॉन अब्राहम नकारात्मक भूमिकेत आहे. शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांचा 'पठान' हा सिनेमा 25 जानेवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. पठाण चित्रपटातील 'बेशरम रंग' हे पहिलं गाणं नुकतंच रिलीज झालं आहे, ज्यामध्ये दीपिका पदुकोण आणि शाहरुख खानची लव्ह केमिस्ट्री पहायला मिळत आहे.

परंतू शाहरुख आणि दीपिकाच्या या गाण्यावरून सोशल मीडियावर वाद बराच होत आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रदर्शित होताना आणखी काय नवा वाद निर्माण होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weekly Horoscope: काहींना कामात यश मिळेल तर काहींना प्रवास जपून करावा लागेल, पाहा साप्ताहिक राशीभविष्य

Nishikant Dubey Anti-Marathi : मराठी माणसाला डिवचा, प्रसिद्धी मिळवा; लालू, अमरसिंहनंतर आला निशिकांत दुबे

Pakistan : पाकिस्तानात होणार सत्तापालट? असीम मुनीर होणार राष्ट्रपती? बिलावल भुट्टोच्या विधानामुळे खळबळ

Russia News : पुतिन यांनी मंत्रिमडळातून काढलं; काही तासांतच मंत्र्याने आयुष्य संपवलं, जगात खळबळ

Shravan Somvar: पहिल्या श्रावण सोमवारी करा 'असे' उपाय, महादेव होतील प्रसन्न

SCROLL FOR NEXT