Shahrukh Khan Abs in Pathan  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Pathan Movie Craze: फॅनच्या अजब प्रश्नांनावर शाहरुखचे गजब उत्तर, कुणाला अॅब्सची तर कुणाला गर्लफ्रेंडची चिंता

ट्विटरवर '#asksrk' सेशनमध्ये शाहरुखचे फॅन्स त्याला विचित्र प्रश्न विचारतात.

Pooja Dange

Shah Rukh Khan On Twitter: शाहरुख खानचा 'पठान' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ४ वर्षांनी शाहरुख मोठ्या पडद्यावर पुन्हा दिसणार आहे. दीपिका या चित्रपटामध्ये जबदस्त अॅक्शन करताना दिसणार आहे. तर जॉन अब्राहम या चित्रपटामध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. म्हणजे चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी केवळ ३ दिवस बाकी आहेत. शाहरुखच्या फॅन्स त्याचा हा चित्रपट बघण्यासाठी उत्सुक आहेत. जगभरातील सर्व चित्रपटगृहांमध्ये या चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे बुकिंग हाऊस फुल झाले आहे.

शाहरुखच्या फॅन्सनी चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग केले आहे. शाहरुखच्या चाहत्यांसाठी त्याचा चित्रपट येणे एखाद्या सणासारखे आहे. त्याच्या फॅन पेजने शाहरुखचा चित्रपट पाहण्यासाठी संपूर्ण थिएटर बुक केले आहे. चित्रपट प्रदर्शनाचा दिवस जसा जवळ येत तसे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचत आहे. म्हणूनच की काय शाहरुखने त्याच्या फॅन्सचे आणि प्रेक्षकांचे मानण्यासाठी ट्विटरवर '#asksrk' हे सेशन केले.

जसे दिवस कमी होत आहे या सेशनमध्ये शाहरुखचे फॅन्स त्याला विचित्र प्रश्न विचारतात हे आपण आधी पाहिले आहे. दरम्यान शारुखच्या एका फॅनने त्याला गर्लफ्रेंड नाहीय तर चित्रपट बघायला कसा जाऊ असे विचारले. त्यावर किंग खानने उत्तर दिले गर्लफ्रेंड साठी संपूर्ण आयुष्य बाकी आहे. तर शाहरुखच्या एका चाहत्याने त्याला 'पठान' चित्रपटामध्ये त्याचे किती अॅब्स आहेत असे विचारले.

यावर उत्तर देत शाहरुख खान म्हणाला की, माझे अॅब्स पुरावा आहेत, माझा कामाचा आणि मेहनतीचा. या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये, ट्रेलरमध्ये जिथे शाहरुख दिसत आहे तिथे तुम्ही पाहू शकता की त्याने त्याचे शरीर किती फिट ठेवले आहे. दरम्यान एका नेटकाऱ्याने शाहरुखला 'पठान' चित्रपट कसा आहे? असे विचारले. यावर शाहरुख म्हणाला, "आम्ही निर्माते आहोत, समीक्षक नाही. दोन्ही कामे वेगळी आहेत. चित्रपट बनविण्यासारखा दुसरा आनंद नाही. यात तुम्ही समजून जा की चित्रपट कसा असणार आहे ते."

'पठान' चित्रपट सुरुवातीपासूनचा वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. त्यातील 'बेशरम रंग' हे गाणे प्रदर्शित झाल्यानंतर आणखी अनेक वाद निर्माण झाले. देशभरात या चित्रपटाला विरोध करण्यात आला. त्यानंतर सेन्सॉर बोर्डने निर्मात्यांना चित्रपटामध्ये बदल करण्यास सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election Commission: निवडणुका स्थगित करा; राज ठाकरे, उद्धव ठाकरेंसह विरोधकांची मागणी, काय आहे कारण?

NCP MLA Sunil Shelke: 'मी जादूटोणा करतो, EVM हॅक करतो', राष्ट्रवादीच्या आमदाराकडून ईव्हीएम वश

Election Commission of India: मतदार यादीत घोळ, आयोगाची वेबसाईट कोण हँडल करतंय? वडेट्टीवारांचा आरोप

Maharashtra Politics: शरद पवार यांना धक्का! पक्षफुटीनंतरही साथ न सोडणाऱ्या निष्ठावंत नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Fact Check: दिवाळीत अंबानींकडून 'फ्री गोल्ड'; सोन्याची चेन मोफत देण्याची घोषणा? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

SCROLL FOR NEXT