Shah Rukh Khan After Accident Viral Video Instagram
मनोरंजन बातम्या

Shah Rukh Khan Spotted Mumbai: अपघातानंतर मुंबईत परतला 'किंग खान', शाहरुखचा VIDEO पाहून चाहत्यांना मिळाला दिलासा

Shah Rukh Khan After Accident Viral Video: लॉस एंजलिसमध्ये अपघातानंतर शस्त्रक्रिया झाल्यानंतर शाहरूख मुंबईत परतला आहे.

Chetan Bodke

Shah Rukh Khan Accident News Update: बॉलिवूडचा किंग खान बादशाह शाहरुख खान सध्या बराच चर्चेचा विषय ठरला. नुकताच त्याचा एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान अपघात झाला आहे. अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे ही दुर्घटना घडलीय. शाहरुख खानच्या नाकाला दुखापत झाली असून एक छोटी सर्जरी लागल्याने चाहत्यांना किरकोळ धक्का बसला आहे. तरी काळजी करण्याचे कोणतेही कारण नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. अपघातानंतर अभिनेता मुंबईत परतला आहे.

लॉस एंजेलिसमध्ये एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान, शाहरुख खानच्या नाकाला दुखापत झाली आहे. ज्यामुळे त्याला किरकोळ शस्त्रक्रिया करायला लागली आहे. दुखापतीमुळे त्याच्या नाकातून रक्त येऊ लागल्याने डॉक्टरांनी किरकोळ ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. नुकताच बुधवारी सकाळी अर्थात आज सकाळी शाहरूख मुंबईत परतला आहे. अपघातानंतर लाडक्या अभिनेत्याला पाहिल्यानंतर चाहते खूपच खुश झाले आहेत. शाहरूख आज सकाळी मुंबई विमानतळावर स्पॉट झाला आहे.

सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘विरल भयानी’ने सोशल मीडियावर शाहरूखच्या काही व्हिडिओ शेअर केल्या आहेत. ज्यात शाहरुखची अपघातानंतर पहिली झलक पाहिल्यानंतर चाहते आनंदित झाले आहेत. शाहरुखला बुधवारी सकाळी मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आला. विमानतळावरील फोटो मध्ये तो तंदुरुस्त आणि उत्तम दिसत होता. पापाराझींनी त्याचे फोटो आणि व्हिडिओ शेयर केले आहेत.

व्हायरल होणाऱ्या फोटोत आणि व्हिडिओत सुपरस्टार किंग खान व्यवस्थित आणि ठणठणीत दिसत आहे.त्याच्या चेहेऱ्यावर कोणतीच जखम किंवा शस्त्रक्रिया केलेल्या कोणती खूण देखील दिसत नाही. त्याच्या उत्तम प्रकृतीसाठी प्रार्थना करणाऱ्या युजर्सने फोटो पाहून सुटकेचा निश्वास सोडलाय. शाहरूखने यावेळी, निळ्या रंगाचा हूडेड स्वेटशर्ट, पांढरा टी-शर्ट , निळ्या डेनिम पॅंटसोबत काळी टोपी, ब्लॅक सनग्लासेस आणि स्टेटमेंट ब्रेसलेटमध्ये त्याला पापाराझींनी स्पॉट केलं.

यावेळी शाहरूख एकटाच नव्हता, त्याच्यासोबत पत्नी गौरी खान, लहान मुलगा अबराम खान देखील होता. शाहरूखवर ज्यावेळी शस्त्रक्रिया करण्यात आली त्यावेळी त्याची पत्नी गौरी देखील त्याच्यासोबत होती. शाहरूखचे या वर्षी एकूण तीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. येत्या ७ सप्टेंबरला शाहरूखचा ‘जवान’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्याचा या वर्षातील हा दुसरा चित्रपट असून आधी ‘पठान’मुळे नंतर ‘जवान’मुळे अभिनेता तुफान चर्चेत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT