Jhume Jo Pathaan Viral Video Saam TV
मनोरंजन बातम्या

Viral Video: 'पठान'ची भुरळ महाविद्यालयीन विद्यार्थी अन् शिक्षकांनाही, धरला जबरदस्त ठेका; किंग खानलाही हसू आवरेना

व्हायरल होत असणाऱ्या व्हिडिओत काही विद्यार्थी आणि शिक्षिका 'झुमे जो पठान' या गाण्यावर ठेका धरताना दिसत आहे.

Chetan Bodke

Jhume Jo Pathaan Song Viral Video: 'पठान' चित्रपट प्रदर्शित होऊन तब्बल २७ दिवस झाले आहेत. अनेक बॉलिवूड चित्रपटांचा रेकॉर्ड मोडित काढत या चित्रपटाने अखेर काल १००० कोटींचा टप्पा पार केला आहे. चित्रपटासोबतच गाण्यांनीही चांगलाच धुमाकूळ घातला आहे. चित्रपटातील एक गाणे म्हणजेच 'झुमे जो पठान'. या गाण्यने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. सध्या याच गाण्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हायरल होत असणाऱ्या व्हिडिओत काही विद्यार्थी आणि शिक्षिका 'झुमे जो पठान' या गाण्यावर ठेका धरताना दिसत आहे.

ही व्हायरल होत असलेली व्हिडीओ दिल्ली विद्यापीठातील असल्याचे कळत आहे. हा व्हिडीओ गेल्या अनेक दिवसापासून तुफान व्हायरल होत असून शाहरुख खानने पुन्हा एकदा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत त्याने कॅप्शन दिली की, 'असे शिक्षक आणि प्राध्यापक मिळणे किती भाग्यवान आहे. जे विद्यार्थ्यांना शिकवतातही आणि त्यांच्या धम्माल मस्ती देखील करतात. ते सर्व शिक्षक रॉकस्टार'.

सध्या ही व्हिडिओ सोशल मीडियावर पुन्हा तुफान व्हायरल होत आहे.जिझस अँड मेरी कॉलेजच्या वाणिज्य विभागाच्या इन्स्टाग्राम पेजने हा व्हिडीओ सर्वात आधी शेअर केला होता.

'पठान' चित्रपटाने 20 फेब्रुवारी रोजी 1.50 कोटी ते 3 कोटी रुपयांची कमाई केल्याचे सांगितले जात आहे. 19 फेब्रुवारीच्या तुलनेत हा आकडा घसरला आहे, YRF ने नुकतीच त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी 'पठान' चित्रपटाने 1000 कोटींचा एकदा पार केल्याचे म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : सोनभद्रच्या खाणीत मोठी दुर्घटना, २ जणांचा मृत्यू, ढिगाऱ्याखाली १५ जण गाडल्याची भीती

भाजपनं व्होटचोरीतून निवडणूक जिंकली? व्होटशेअरवरुन नव्या चर्चेला उधाण

Passport Service Change : पासपोर्ट सेवेत महत्वाचा बदल, केंद्र सरकारकडून मोठी घोषणा, जुन्या पासपोर्टचं काय?

७५ लाख महिलांच्या खात्यावर ₹ १०,०००; रेवडी वाटपावर पवारांचा सवाल, फडणवीसांचे उत्तर, वाचा स्पेशल रिपोर्ट

Shubman Gill Hospitalised: भारताचा कर्णधार शुभमन गिल हॉस्पिटलमध्ये दाखल, नेमकं काय झालंय? महत्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT