Shah Rukh Khan reacts to PM Modi’s welcome with Chaiyya Chaiyya at White House Saam TV
मनोरंजन बातम्या

Shah Rukh Khan On PM Modi's Welcome : मला जर ट्रेन नेण्याची परवानगी असती तर... मोदींच्या व्हाईट हाऊस स्वागतावर शाहरुखची प्रतिक्रिया

Shah Rukh Khan To Fans : एका चाहत्याने त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छैय्या छैय्या या हिट गाण्याने अमेरिकेतील व्हाईट हाऊसमध्ये केलेल्या स्वागताबद्दल विचारले.

Pooja Dange

Shah Rukh Khan In Ask SRK Session On Twitter : शाहरुख खानने २५ जून रोजी बॉलिवूड इंडस्ट्रीत 31 वर्षे पूर्ण केली आहेत. या तीन दशकात शाहरुखने अनेक हिट चित्रपट दिले आहेत आणि पुढेही देत राहील. त्याने 1992 मध्ये दिव्या भारती, ऋषी कपूर आणि अमरीश पुरी यांच्यासोबत दिवाना चित्रपटातून इंडस्ट्रीत पदार्पण केले.

हा क्षण साजरा करण्यासाठी, SRK ने ट्विटरवर ‘आस्क SRK’ सेशन घेतले. चाहत्यांच्या प्रश्नांना त्याने भन्नाट उत्तरे दिली. सत्रादरम्यान, एका चाहत्याने त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छैय्या छैय्या या हिट गाण्याने अमेरिकेतील व्हाईट हाऊसमध्ये केलेल्या स्वागताबद्दल विचारले. (Latest Entertainment News)

ट्विटरवर #AskSRK सेशन दरम्यान, एका चाहत्याने शाहरुख खानला विचारले की अमेरिकेतील व्हाईट हाऊसमध्ये छैय्या छैय्या या गाण्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत करण्यात आले तेव्हा कसे वाटले.

शाहरुख खानच्या चाहत्यांचा प्रश्न असा होता की, "सर छैय्या छैय्याने मोदीजींचे US मध्ये स्वागत केले....याबद्दल तुम्हाला काय म्हणायचे आहे?" यावर उत्तर देताना साहारूखब म्हटले की, "मी तिथे प्रत्यक्ष डान्स करायला असायला हवं .... पण माझ्या मते ते ट्रेन आत नेण्याची परवानगी देणार नाहीत???!!!"

या उत्तरावर चाहते प्रतिक्रिया देताना दिसले. एकाने लिहिले की, “विचारपूर्वक दिलेले उत्तर.” दुसर्‍याने कमेंट केली, “भाई, तुम्हीच प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मनापासून देतो.”

गुरूवारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राष्ट्रपती जो बिडेन आणि फर्स्ट लेडी जिल बिडेन यांच्या हस्ते व्हाईट हाऊसमध्ये स्वागत करण्यात आले. पेन मसाला या अमेरिकन ए कॅपेला ग्रुपने शाहरुख खानचा आयकॉनिक गाणे 'छैय्या छैय्या' पीएम मोदींच्या आगमनानंतर सादर केला.

दरम्यान, शाहरुख खानचाय वर्कफ्रंटविषयी बोलायचे तर, शाहरुख दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम सोबत 'पठान' या सुपरहिट चित्रपटामध्ये दिसला होता. यानंतर Atlee'sच्या Jawan मध्ये दिसणार आहे ज्यात नयनतारा आणि विजय सेतुपती प्रमुख भूमिकेत आहेत. हा चित्रपट ७ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. तर राजकुमार हीनारी यांच्या डंकीमध्ये देखील शाहरुख दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पंढरपूरहून आषाढी वारी हुन परतणाऱ्या वारकऱ्यांसाठी उभारले अन्नछत्र

Garam masala: कोणत्या भाज्यांमध्ये गरम मसाला वापरू नये?

Ind vs Eng : एजबॅस्टनच्या विजयानंतर टीम इंडियात होणार बदल! शुभमन गिलने दिली मोठी माहिती, कुणाला मिळणार डच्चू?

Nandurbar : नंदुरबारच्या सातपुड्यात पर्यटकांची हुल्लडबाजी | VIDEO

Karjat near waterfall: कर्जतपासून अवघ्या 20 किमीवर लपलाय 'हा' धबधबा; पावसाचा आनंद घेण्यासाठी बेस्ट ठिकाण

SCROLL FOR NEXT