Pathan Movie News: 'पठान' चित्रपटावरून बराच गदारोळ सध्या देशभरात सुरू आहे. पठान चित्रपटातील 'बेशरम रंग' हे गाणे प्रदर्शित होताच वादाला सुरूवात झाली. या गाण्यात दीपिका पदुकोणने भगव्या रंगाची बिकिनी घातली आहे. या भगव्या रंगावर भाजप नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. इतकंच नाही तर अश्लीलता पसरवल्याच्या जात असल्याचे म्हणत दीपिका पदुकोणसह पठान चित्रपट आणि शाहरुख खान यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. आता शाहरुख खानच्या चित्रपटाविरोधात मुस्लिम बोर्डही रिंगणात उतरले असून पठान चित्रपट बंद करण्याची मागणी बोर्डाने केली आहे.
माध्यमांच्या हाती आलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशच्या उलेमा बोर्डाने पठान चित्रपट आणि त्यातील 'बेशरम रंग' गाण्यावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच चित्रपटगृहांमध्ये चित्रपट प्रदर्शित करू नये अशी मागणी केली आहे. बोर्डाचे प्रमुख सय्यद अनस अली म्हणाले की, 'पठान' हा अत्यंत प्रतिष्ठित समुदाय होता आणि चित्रपट इस्लामचा अपमान होत आहे. बोर्डाने 'पठान' या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली असून सय्यद अनास अली यांनी 'अश्लीलते'मुळे चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यापासून थांबवावे, असे म्हटले आहे.
सय्यद अनस अली यांनी सांगितले की, 'पठान' चित्रपटातील अश्लीलतेविषयी त्यांना अनेक कॉल आणि तक्रारी आल्या आहेत. चित्रपटात इस्लामचा चुकीचा प्रचार करण्यात आला आहे. सय्यद अनस अली म्हणाले, 'पठान नावाचा चित्रपट बनवला आहे ज्यामध्ये शाहरुख खान नायक आहे, लोक त्याला पाहतात आणि पसंत करतात, परंतु आम्हाला कॉल आणि तक्रारी आल्या आहेत आणि त्यांनी या चित्रपटातील अश्लीलता आणि इस्लामचे चुकीचे चित्रण यावर टीका करत संताप व्यक्त केला आहे. (Movie)
आपला इस्लाम, आपला धर्म कोणी कसा मांडेल याच्याशी तडजोड न करणे हा आपला हक्क आहे.जर कोणी इस्लामची चुकीची व्याख्या मांडत असेल तर आपल्या धर्माची योग्य व्याख्या मांडण्याची जबाबदारी आपली आहे. मी सेन्सॉर बोर्डाला आवाहन करतो आणि भारतातील सर्व थिएटर मालकांना सांगू इच्छितो की हा चित्रपट कुठेही प्रदर्शित होऊ देऊ नये. कारण यामुळे चुकीचा संदेश जाईल, शांतता भंग होईल आणि या देशातील सर्व मुस्लिमांच्या भावना दुखावल्या जातील आणि आमची चेष्टा केली जाईल.
पठानसारखे चित्रपट इस्लाम आणि मुस्लिमांची खिल्ली उडवण्यासाठी बनवले जातात. त्यांना विरोध झाला पाहिजे. पठान हा अत्यंत आदरणीय समुदाय आहे पण चित्रपटात त्यांना अतिशय चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आले आहे. शाहरुख खानला उमराहसाठी व्हिसा न देण्याची शिफारस हज समितीने केल्याचेही सय्यद अनस अली यांनी म्हटले आहे. पठान चित्रपट २५ जानेवारी २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. (Shah Rukh Khan)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.