Shah Rukh Khan SAAM T V
मनोरंजन बातम्या

Shah Rukh Khan : किंग खानला पाहताच चाहते भांबावले, एअरपोर्टवर घातला घेराव; शाहरुखच्या जबऱ्या फॅन्सचा व्हिडीओ व्हायरल

Shah Rukh Khan Airport Viral Video : मुंबई एअरपोर्टवर शाहरुख खान स्पॉट झाला. चाहत्यांचे प्रेम दाखवणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. ज्यात शाहरुख खान भोवती चाहत्यांचा गराडा पाहायला मिळत आहे.

Shreya Maskar

बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) गुरुवारी पहाटे मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाला. तो तिथून आयफा 2024 साठी अबुधाबीला रवाना झाला. मात्र एअरपोर्टवर (Airport Viral Video) पोहचल्यावर चाहत्यांनी त्याला गराडा घातला. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

एअरपोर्टवर शाहरुख खानसोबत बॉडीगार्ड रवी आणि मॅनेजर पूजा ददलानीही होते. किंग खान एअरपोर्टवर पोहचताच चाहत्यांनी त्याच्या भोवती गराडा घातला. त्यामुळे एअरपोर्टवर गोंधळ झाला. चाहत्यांना किंगसोबत फोटो घ्यायचे होते. त्याला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी पाहायला मिळाली.

बॉडीगार्डने गर्दीतून रस्ता काढत शाहरुख खानला वाट मोकळी करून दिली. शाहरुखने चाहत्यांना किती वेड लावले आहे. हे या व्हिडिओवरून समजत आहे. शाहरुख खान एअरपोर्टवर कॅज्युअल लूकमध्ये स्पॉट झाला. त्याने काळ्या रंगाचा हुडी, सनग्लासेस आणि कॅप घातली होती, ज्यात तो खूपच कमाल दिसत आहे. त्याने जाताना चाहत्यांना एकस्मित हास्य देखील केलं. चाहत्यांनी त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ काढले आहेत. हे चाहत्यांचे प्रेम शाहरुख खानने मिळवले आहे. चाहते त्यांच्यावर वेड्यासारखे प्रेम करतात.

एअरपोर्टवर शाहरुख खान जाताना चाहते त्याच्या नावाचा जयघोष करताना पाहायला मिळत आहे. यामुळे किंग खान करण जोहरसोबत अबू धाबीमध्ये आयफा अवॉर्ड्स 2024 होस्ट करणार आहे. तसेच तो लवकरच 'किंग' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चाहते नेहमीच किंग खानच्या चित्रपटांची वाट पाहत असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rasgulla Recipe: मऊसूत आणि टेस्टी रसगुल्ला घरच्या घरी बनवा फक्त ३० मिनिटांत

Maharashtra Live News Update अमरावतीत 24 तासात मुसळधार पावसाचा इशारा

माता न तू वैरिणी! चिमुकलीला अमानुष मारहाण, व्हिडिओ व्हायरल होताच आई...; ठाण्यातील खळबळजनक घटना|VIDEO

Maharashtra Police Transfer : महाराष्ट्र पोलिस दलात खांदेपालट; २२ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे बदली?

MNS : मराठी असूनही ते एका मराठी मुलीलाच टार्गेट करत आहेत, मनसे नेत्याच्या मुलाकडून शिवीगाळ; इन्फ्लूएन्सरने सांगितली आपबिती

SCROLL FOR NEXT