SRK Reveal if he's Quit Smoking Saam Tv
मनोरंजन बातम्या

SRK Reveal if he's Quit Smoking: ‘तू सिगारेट सोडलीस का?’ प्रश्नावर किंग खानने दिलेले उत्तर पाहून चाहते चक्रावले, काळजी घे... म्हणत फॅन्सने दिला मोलाचा सल्ला

Shah Rukh Khan In AskSRK: सध्या किंग खानने सोशल मीडियावर #AskSRK या सेशनच्या माध्यमातून त्याने चाहत्यांच्या अनेक प्रश्नांचे उत्तर दिले.

Chetan Bodke

Netizens Ask SRK In Quit Smoking: बॉलिवूड अभिनेता शाहरुखचा लवकरच ‘जवान’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. शाहरुख तब्बल चार वर्षांच्या मोठ्या गॅपनंतर तो ‘पठान’ चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या वर्षातील शाहरूखचा दुसरा चित्रपट असून प्रेक्षकांना या चित्रपटाची खूपच उत्सुकता आहे. सध्या किंग खानने सोशल मीडियावर #AskSRK या सेशनच्या माध्यमातून त्याने चाहत्यांच्या अनेक प्रश्नांचे उत्तर दिले.

यावेळी शाहरुखला ट्विटरवर #AskSRK मध्ये शाहरुखला एका चाहत्याने “तू सिगारेट सोडलीस का?” असा प्रश्न विचारला. यावर शाहरुख म्हणतो, “होय, मी खोटं बोललो… मी स्वत:ला कॅन्सरच्या धुराने वेढून घेतले आहे.” शाहरुखचे उत्तर पाहून त्याच्या चाहत्यांनी “जरा काळजी घेत जा” असा मोलाचा सल्ला दिला आहे.

२०११ ला एका चित्रपटानिमित्त शाहरुखने सिगारेट ओढण्याच्या सवयीबाबत खुलासा केला होता. मुलाखतीत तो म्हणतो, “मी दिवसाला १०० सिगारेट ओढतो, त्यामुळे मला झोप येत नाही. त्यामुळे मी जेवण तर नाहीच पण, पाणी सुद्धा पित नाही. सोबतच सिगारेट व्यतिरिक्त मी शूटिंगमध्ये असताना, ३० कप ब्लॅक कॉफीचं मी शूटिंगमध्ये मी सेवन करतो. तरीही माझी बॉडी, सिक्स पॅक ॲब्स आहेत. त्यामुळे मी माझी जास्त काही काळजी घेत नाही. अनेकदा चित्रपटाच्या शूटिंगनिमित्त माझी काळजी आपोआप कोणाकडून तरी घेतली जाते, असं म्हणालो तरी चुकीचं नाही. ”

येत्या ७ सप्टेंबरला शाहरूखचा ‘जवान’ चित्रपट भेटीला येणार असून त्यासोबत प्रमुख भूमिकेत दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारादेखील दिसणार आहे. ‘पठान’नंतर शाहरुखचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ज्येष्ठ छायाचित्रकार रजनीश काकडे यांचे निधन; अनेक पुरस्कारांचे ठरले होते मानकरी

RTI Informationच्या माध्यमातून पत्नी नवऱ्याचा पगार जाणून घेऊ शकते का? कोर्टानं काय दिला निर्णय

Tuesday Horoscope : आयुष्यात वादळ येणार; ५ राशींच्या लोकांच्या हातातून धनसंपत्ती निसटणार

Maharashtra Live News Update: मिरा-भाईंदर: पोलीस भरतीदरम्यान घेतलं 'ड्रग्ज'चे इंजेक्शन, बारामतीच्या उमेदवाराला अटक

Tuesday Horoscope: प्रेम, करिअर आणि पैसा कमवण्यासाठी नवीन संधी मिळेल, ताण कमी होईल; वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT