Jawan Shoot Photos Leack Twitter
मनोरंजन बातम्या

Jawan Shoot Photos Leak: ‘बेशरम रंग’ नंतर ‘जवान’मध्येही शाहरूख- दीपिका करणार अफलातून रोमान्स; व्हायरल फोटो पाहून नेटकरी चक्रावले

अटली कुमार दिग्दर्शित ‘जवान’ चित्रपटाची घोषणा झाल्यापासून रोजच चित्रपटातील नवनवीन अपडेट प्रेक्षकांच्या समोर येत आहेत.

Chetan Bodke

Jawan Shoot Photos Leack: अटली कुमार दिग्दर्शित ‘जवान’ चित्रपटाची घोषणा झाल्यापासून रोजच चित्रपटातील नवनवीन अपडेट प्रेक्षकांच्या समोर येत आहेत. ‘पठान’ ने बॉक्स ऑफिसवर गगन भरारी घेतल्यानंतर शाहरुख खान लवकरच ‘जवान’ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या चित्रपटाची शूटिंग सुरू असून सध्या शूटिंग दरम्यानचा एक फोटो सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या फोटोत, ‘पठान’नंतर ‘जवान’ सिनेमातही दीपिका पदुकोण- शाहरूख खान एकत्र दिसण्याची शक्यता आहे.

‘जवान’ सिनेमात शाहरूखसोबत नयनतारा झळकणार असल्याची माहिती सर्वांनाच माहित आहे. ‘जवान’मध्ये शाहरूखसाठी नयनताराच्या मेहनतीचेही बरेच सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाले होते. नयनतारा मुख्य भूमिकेत असून चित्रपटात दीपिकाने शाहरूखसोबत छोटा कॅमिओ पात्र साकारल्याचे दिसत आहे. नुकताच जवानच्या सेटवरून दीपिका पदूकोण आणि शाहरुख खानचे काही फोटो लीक झाले आहेत. चित्रपटात दोन्ही कलाकार खास आणि वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या समोर येण्याची शक्यता आहे.

E- Times ने शेअर केलेल्या फोटोंनुसार, दीपिका पदुकोण आणि शाहरूखचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. या फोटोंमध्ये शाहरूख आणि दीपिकाच्या कपड्यांनी सर्वांचेच लक्ष वेधले. व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये शाहरूख आणि दीपिकाने व्हाईट शर्ट आणि ब्लॅक पँट घातलेल्या फोटोंनी सर्वांचेच लक्ष वेधले. सोबतच हातात लाल रंगाचा कोट पकडला असून गळ्यात जाडसर रशी दिसत आहे. सध्या या दोघांचेही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी या फोटोंवर जबरदस्त लाईक्स आणि कमेंट केल्या आहेत.

‘जवान’ सिनेमात शाहरुख खान आणि दीपिका पदूकोण व्यतिरिक्त नयनतारा, विजय सेतुपति, संजय दत्त आणि सुनील ग्रोव्हर मुख्य भूमिकांमध्ये दिसणार आहेत. ‘जवान’ सिनेमा २ जूनला प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा हिंदी,तामिळ,तेलुगु,मल्याळम,कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pradeep Purnekar Case : पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, नवीन व्हिडीओ आला समोर, मुलाचा खळबळजनक दावा

Maharashtra News Live Update: दिल्लीच्या हवेची गुणवत्ता खालावली

Rice Hacks : भात शिजवताना १ तमालपत्र नक्की घाला; मिळतील 'हे' ६ फायदे

जरांगे-पाटील संधी साधूपणा करताय; भरत गोगावलेंचा टोला,शिंदेंवरील 500 कोटींच्या आरोपांवरून राजकारण तापलं!

Khardi Kasara : लोकल प्रवाशांसाठी खूशखबर! कसारा-खर्डी मार्गावर सुरू झाली तिसरी मार्गिका; प्रवास होणार सुपरफास्ट

SCROLL FOR NEXT