Shaakuntalam Movie News Saam Tv
मनोरंजन बातम्या

शाकुंतलम 'या' दिवशी होणार रिलीज; चित्रपटात समंथा प्रभू राजकुमारीच्या भूमिकेत

चित्रपट निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख आणि चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज केले आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतीस प्रसिद्ध अभिनेत्री समंथा प्रभू (Samantha Prabhu)सध्या तिच्या 'प्रोफेशनल टू पर्सनल' लाईफमुळे प्रकाशझोतात आली आहे. येत्या काळात अभिनेत्री समंथा प्रभू चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'शाकुंतलम' असे या चित्रपटाचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी निर्मात्यांनी चित्रपटाचे पोस्टर रिलीज करत चित्रपटाविषयीची चाहत्यांची उत्सुकता वाढवली होती. आता प्रेक्षकांना चित्रपटाची जास्त प्रतिक्षा करावी लागणार नाही. नुकताच निर्मात्यांनी चित्रपटाविषयीची नवीन अपडेट दिली आहे.

चित्रपट निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख जाहीर केली आहे. यासह निर्मात्यांनी चित्रपटाचे पहिले मोशन पोस्टर रिलीज केले आहे.समंथा प्रभूने तिच्या इन्स्टाग्रामवर अकाउंटवर पोस्ट शेअर करत 'नोव्हेंबर ४ ला पाहा #शाकुंतलम' असा कॅप्शन दिला आहे. चित्रपटात समंथा प्रभू रूपेरी पडद्यावर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

गुणशेखर दिग्दर्शित शाकुंतलम या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख स्पष्ट केली आहे. शाकुंतलम हा चित्रपट कवी कालिदास यांच्या शाकुंतलम या पौराणिक कथेवर आधारित आहे. चित्रपटात शकुंतला आणि दुष्यंत यांची प्रेमकहाणी दाखवण्यात येणार आहे. चित्रपटात समंथा प्रभू राजकुमारी शकुंतला ची भूमिका साकारणार आहे. तर अभिनेता देव मोहन राजा दुष्यंत च्या भूमिकेत आहे. यासह सचिन खेडेकर, कबीर बेदी, डॉ. एम.मोहन बाबू, प्रकाश राज.मधुबाला, गौतमी, आदिती बालन, अनन्या नागल्ला आणि जिशु सेनगुप्ता यांच्याही भूमिका आहेत. चित्रपट हा ४ नोव्हेंबर २०२२ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होईल.

Edited By - Manasvi Choudhary

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नगरसेविका रेखा यादव यांच्याकडे दोन रेशन कार्ड, 3 मतदान कार्ड; काँग्रेसची चौकशीची मागणी

Maharashtra News Live Update: अहिल्यानगर विधान परिषद निवडणूक अखेर बिनविरोध

Team India : भारतीय विकेटकीपर-फलंदाजाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा, रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियात केलं होतं पदार्पण

Belly Fat Loss Exercise: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी करा हे सोपे व्यायाम; घरच्या घरी मिळवा फिट आणि सडपातळ शरीर

Silver Jodavi Design: वटपौर्णिमेसाठी खरेदी करा खास या ७ नव्य डिझाइन्सची सिल्व्हर जोडवी

SCROLL FOR NEXT