Sarzameen  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Sarzameen : "यहां हर फैसला एक कुर्बानी है..."; इब्राहिम अली खानच्या 'सरजमीन'चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर, पाहा VIDEO

Sarzameen Trailer : काजोल आणि इब्राहिम अली खानच्या 'सरझमीन' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. ट्रेलरमधील इब्राहिमच्या लूकने लक्ष वेधून घेतले आहे.

Shreya Maskar

बॉलिवूड अभिनेत्री काजोलचा (kajol ) 'माँ' चित्रपट सध्या बॉक्सवर धुमाकूळ घालत आहे. अशात आता काजोल एका नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काजोलच्या 'सरझमीन' (Sarzameen) चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटात काजोलसोबत इब्राहिम अली खान (Ibrahim Ali Khan) पाहायला मिळणार आहे. तो मुख्य भूमिकेत झळकणार आहे. ट्रेलरमधील त्याच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

धमाकेदार ट्रेलर

'सरझमीन' चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये इब्राहिम अली खान रक्तबंबाळ झालेला दिसत आहे. ट्रेलरची सुरुवात बर्फाच्छिदित प्रदेशातून होताना दिसत आहे. ट्रेलरमधील इब्राहिम अली खान ॲक्शन मोडमध्ये पाहायला मिळत आहे. चित्रपटात फुल ड्रामा, ॲक्शन पाहायला मिळणार आहे.

'सरझमीन' रिलीज डेट

'सरझमीन' चित्रपटाच्या ट्रेलरला खूप हटके कॅप्शन देण्यात आले आहे. कॅप्शनमध्ये लिहिलं की, "यहाँ हर फैसला एक कुर्बानी है, देश की या अपनों की… कुछ ऐसी सरजमीं की कहानी है..." ट्रेलरवर चाहते आणि कलाकारांकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे. सरझमीन चित्रपट 25 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट जिओ हॉटस्टारवर पाहायला मिळणार आहे.

'सरझमीन' स्टारकास्ट

'सरझमीन' या चित्रपटात काजोल, इब्राहिम अली खान, साउथ सुपरस्टार पृथ्वीराज,तारा शर्मा हे कलाकार पाहायला मिळणार आहेत. 'सरजमीन' या चित्रपटाचे दिग्दर्शन केओझे इरानी यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

दारु पिऊन शिक्षकाचा शाळेतच विद्यार्थ्यांसोबत डान्स; व्हिडिओ पाहून राग अनावर होईल

Shirdi Sai Temple: विठू माऊली तू, माऊली जगाची...; आषाढीचा उत्साह शिर्डीत, फुलांनी सजले साई मंदिर

Thackeray Brothers : ठाकरेंच्या लढ्याला दक्षिणेचा पाठिंबा, थेट मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक, म्हणाले प्रेरणादायी...

Karjat Tourism : हिरव्यागार जंगलात लपलेला सुंदर धबधबा, पावसाळ्यात वीकेंड येथेच प्लान करा

SCROLL FOR NEXT