Kartiki Gaikwad Baby Shower Photos Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kartiki Gaikwad: कुणीतरी येणार येणार गं! कार्तिकी गायकवाड होणार आई, ओटीभरण कार्यक्रमाचे फोटो व्हायरल

Kartiki Gaikwad Baby Shower Photos: कार्तिकीने २०२० मध्ये रोनित पिसेसोबत लग्न केले होते. लग्नाच्या चार वर्षांनंतर आता कार्तिकीच्या घरामध्ये नवा पाहुणा येणार असल्यामुळे तिच्या कुटुंबीयातील प्रत्येक सदस्य आनंदी आहे.

Priya More

Kartiki Gaikwad Pregnant:

'सारेगमप लिटिल चॅम्प' (Saregama Litil Champ) फेम कार्तिकी गायकवाड (Kartki Gaikwad) सध्या चर्चेत आली आहे. कार्तिकी गायकवाडच्या घरी लवकरच नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. लग्नाच्या चार वर्षांनंतर कार्तिकी गायकवाड आई होणार आहे. नुकताच कार्तिकीचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कार्तिकीच्या चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

सारेगमप लिटिल चॅम्पच्या माध्यमातून घराघरामध्ये पोहचलेली कार्तिकी गायकवाड लवकरच आई होणार आहे. कार्तिकीने २०२० मध्ये रोनित पिसेसोबत लग्न केले होते. लग्नाच्या चार वर्षांनंतर आता कार्तिकीच्या घरामध्ये नवा पाहुणा येणार असल्यामुळे तिच्या कुटुंबीयातील प्रत्येक सदस्य आनंदी आहे. नुकताच कार्तिकीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर डोहाळे जेवणाचे फोटो शेअर करत गुड न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली. कार्तिकी आई होणार असल्यामुळे तिच्या चाहत्यांना आनंद झाला आहे. त्यांनी तिच्या पोस्टवर कमेंट्स करत शुभेच्छा दिल्या आहेत.

पारंपारिक पद्धतीने कार्तिकी गायकवाडचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात कार्तिकीने हिरव्या रंगाची पैठणी साडी नेसली होती. कार्तिकीने लाइट मेकअप, सुंदर हेअरस्टाइल, फुलांचे दागिने परिधान करत आपला लूक परिपूर्ण केला होता. तर कार्तिकीचा नवरा रोनित पिसेने जोधपूरी सूट परिधान केला होता. यावेळी दोघेही खूपच आनंदी दिसत होते. कार्तिकीच्या चेहऱ्यावरील ग्लो दिसून येत होता.

कार्तिकीने डोहाळे जेवणाचे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये 'ओटीभरण कार्यक्रमातील आनंदाचे क्षण' असे लिहिले आहे. कार्तिकीने यावेळी नवरा, आई-वडील, सासू-सासरे आणि भावांसोबत फोटो काढले आहेत. यावेळी सर्वांनी आजी, आजोबा, मामा असा टॅग घेऊन फोटो काढले. यावेळी सर्वजण खूपच आनंदी दिसत होते. कार्तिकीच्या या पोस्टला तिच्या चाहत्यांनी पसंती दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Green Colour Saree: श्रावणात सणासुदीसाठी नेसा या हिरव्या रंगाच्या सुंदर साड्या

Malvan Tourism : 'मालवण'मधील Hidden पिकनिक स्पॉट, पावसाळ्यात करा फुल टू धमाल

Yogesh Kadam : महाराष्ट्रात तुम्हाला मराठी बोलावंच लागेल, मराठी येत नसेल तर...; योगेश कदमांचा इशारा

Laxman Hake: भटक्या कुत्र्यासारखी हालत करू, महाराष्ट्रात फिरू देणार नाही; राष्ट्रवादी काँग्रेसचा लक्ष्मण हाकेंना इशारा

Shubman Gill double century : कॅप्टन असावा तर असा! शुभमन गिलचं धडाकेबाज द्विशतक, इंग्लंडमध्ये ऐतिहासिक खेळी

SCROLL FOR NEXT