Sara Tendulkar New Video Viral on Social Media: X
मनोरंजन बातम्या

Sara Tendulkar च्या व्हिडिओने इंटरनेटवर लावली आग; चाहत्यांकडून प्रतिक्रियाचा वर्षाव, गिलला विचारले प्रश्न

Sara Tendulkar New Video Viral on Social Media: गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरील चर्चांपासून दूर असलेले सारा आणि गिल पुन्हा एकदा चर्चेत आलेत. दोघांची नावे पुन्हा चर्चेत येण्याचं कारण ठरलं त्यांनी पोस्ट केलेले फोटो.

Bharat Jadhav

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरला कधीही कोणत्याही ओळखीची गरज भासत नाही. निवृत्तीनंतरही त्यांची लोकप्रियता बऱ्यापैकी आहे. त्यांची मुलगी सारा तेंडुलकर गेल्या २ आणि ३ वर्षांपासून सोशल मीडिया स्टार बनलीय. सोशल मीडियावर तिचे अनेक चाहते आहेत. साराच्या सौंदर्यांचे अनेक चाहते आहेत. सारा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती नेहमी नवनवीन फोटो पोस्ट करत असते.

सारा तेंडुलकर आणि क्रिकेटर शुबमन गिल या दोघांचे नाव एकमेकांसोबत सोडलं जातं. साराने कोणता फोटो पोस्ट केला की तिच्या पोस्टवर अनेक चाहते गिलविषयी प्रश्न करतात. आज रविवारी साराने असा एक सुंदर व्हिडिओ शेअर केलाय. हा व्हिडिओ पाहून चाहते वेडे झालेत. तर काही चाहत्यांनी शुबमन गिल आठवला.

सारा तेंडुलकरने लैव्हेंडर रंगाचा लेहेंगा घातलाय. काय ड्रेसवर तिने हा नवीन व्हिडिओ शेअर केलाय. यामध्ये ती फुलांची रील बनवत आहे. या व्हिडिओमध्ये साराचे सौंदर्य फुलापेक्षा कमी दिसत नाहीये. काही तासांतच लोकांनी या व्हिडिओला लाखो लाईक्स आणि कमेंट्स दिल्यात. तर नेहमीप्रमाणे काही चाहत्यांनी तिला शुबमन गिलचा प्रश्न केलाय. यावेळीही चाहत्यांनी अनेक कमेंट्स केल्या आणि भारतीय क्रिकेटर गिललाही प्रश्न विचारले.

सारा आणि शुबमनच्या लिंकअपच्या अफवा काही नवीन नाहीत. गिलसोबत मस्ती करा, अशा अनेक कमेंट्स काहींनी केल्या आहेत. तर कोणी विचारले की, गिल भावा कुठे आहेस, तेव्हा कोणी म्हणाले गिल भाऊ, तुम्ही खूप भाग्यवान आहात. दरम्यान, काही लोकांनी गिल आणि साराच्या प्लॅनिंग आणि पोस्टबद्दलही लिहिलंय. याचं कारण म्हणजे साराने सोशल मीडियावर ही पोस्ट दुपारी चारच्या सुमारास शेअर केली.

या पोस्टनंतर सुमारे २० मिनिटांनंतर, शुबमन गिलने त्याचा सुंदर लूकचा एक व्हिडिओ शेअर केलाय. दरम्यान गेल्या ६ दिवसांपासून गिलने कोणतीच पोस्ट शेअर केली नव्हती. पण आज जेव्हा दोघांनी एकत्र पोस्ट शेअर केली तेव्हा चाहत्यांनी हे खास प्रश्न विचारले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

Bihar Politics: राजकीय वर्तुळात शांतता असताना बिहारमध्ये मोठी घडामोड; माजी सीएमच्या मुलानं थोपटले दंड

SCROLL FOR NEXT