Sara Ali Khan Announce Brother Ibrahim Ali Khan’s Bollywood debut  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ibrahim Ali Khan Bollywood Debut: सैफच्या मुलाची बॉलिवूडमध्ये एन्ट्री?; खुद्द बहिण सारानेच केला महत्वाचा खुलासा...

साराने २०१८ मध्ये ‘केदारनाथ’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं होतं. लवकरच तिचा भाऊ इब्राहिम अली खान हा देखील बॉलिवूडमध्ये डेब्यू करतोय.

Chetan Bodke

Sara Ali Khan Announce Brother Ibrahim Ali Khan’s Bollywood debut: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान नेहमीच आपल्या अभिनयामुळे सोशल मीडियावर तो चर्चेत असतो. त्याची मुलगी सारा अली खानने २०१८ मध्ये ‘केदारनाथ’ चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं. तिच्या नंतर आता लवकरच तिचा भाऊ देखील इब्राहिम अली खान हा बॉलिवूडमध्ये डेब्यू करतोय. त्याच्या बॉलिवूड पदार्पणाची माहिती बहिण सारानेच दिली. साराने याचा खुलासा एका मुलाखतीत केला आहे.

सध्या बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींनी ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२३’ ला हजेरी लावली. त्यामध्ये सारा अली खानने या फेस्टिव्हलमध्ये या वर्षी पहिल्यांदाच हजेरी लावली होती. या मध्ये तिने मुलाखत देताना, तिच्या भावाच्या डेब्यूबद्दल भाष्य केलं. ती मुलाखतीत म्हणते, “इब्राहिमने त्याच्या पहिल्या बॉलीवूड चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे, त्याच्या या गोष्टीवर माझा आजही विश्वास बसत नाही. माझ्या आईप्रमाणे मी पण इब्राहिमवर खूप प्रेम करते. माझी आई आणि मी इब्राहिमवर जीवापाड प्रेम करतो.”

निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरच्या चित्रपटातून अनेक स्टार किड्सने बॉलिवूडमध्ये डेब्यू केलंय. अशातच इब्राहिम देखील आता त्याच्याच चित्रपटातून डेब्यू करणार असल्याची माहिती मिळत आहे. त्याच्या बॉलिवूड डेब्यूची अद्याप अधिकृत माहिती मिळाली नाही. सैफ अली खानची पहिली पत्नी अमृता सिंह हीचे सारा आणि इब्राहिम ही दोन मुलं आहेत. या दोघांचाही २००४ मध्ये घटस्फोट झाला असून ते दोन्ही ही मुलं तेव्हापासून सैफ जवळच राहतात.

सारा आणि विकी प्रमुख भूमिकेत असलेल्या ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट येत्या २ जूनला प्रदर्शित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Paranoia symptoms: प्रत्येक गोष्टीत कटकारस्थान दिसतंय? तज्ज्ञांनी सांगितली पॅरानोइयाची धोकादायक लक्षणं आणि कारणं

Helmet importance: बाईकवर फिरायला जाण्यापूर्वी हेल्मेटबाबत ही एक चूक टाळा

Maharashtra News Live Update: जालन्यात पोलिस-महसूलच्या पथकाचा वाळू माफियांना दणका, 3 हायवा, ट्रॅक्टरसह 64 लाखांचा मुद्देमाल जप्त

Washim Bribe Case : सरपंच महिला ACB च्या जाळ्यात; लाच घेताना रंगेहाथ पकडली

Aadhaar Card: आधार कार्ड हरवलं? घाबरू नका, २ मिनिटांतच मिळवा आधार क्रमांक; फक्त फोलो करा या स्टेप्स

SCROLL FOR NEXT