Aishwarya Rai And Sanjay Leela Bhansali News saam tv
मनोरंजन बातम्या

Aishwarya Rai Birthday News: ऐश्वर्या रायच्या निळ्या डोळ्यांवर फिदा झाले होते संजय लीला भन्साळी, पाहता क्षणीच दिली होती मोठी ऑफर...

Aishwarya Rai News: दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी जेव्हा पहिल्यांदा ऐश्वर्या रायला पाहिलं, त्यावेळी तिच्या डोळ्यांची भुरळ त्यांनाही पडली होती.

Chetan Bodke

Aishwarya Rai And Sanjay Leela Bhansali News

बॉलिवूडची विश्वसुंदरी ऐश्वर्या राय बच्चनचा आज (१ नोव्हेंबर) ५०वा वाढदिवस आहे. केवळ अभिनयच नव्हे तर, आपल्या सौंदर्याने आणि फॅशनमुळे जगभरात ऐश्वर्याने आपली ओळख प्रस्थापित केली. १९९४ मध्ये ऐश्वर्याने मिस वर्ल्डच्या किताबावर आपले नाव कोरले. तिने फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर, अनेक हॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे.

ऐश्वर्याच्या डोळ्यांची नेहमीच चर्चा होते. तिच्या डोळ्यांनी सर्वांनाच भुरळ पाडलीय. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी जेव्हा पहिल्यांदा ऐश्वर्या रायला पाहिलं, त्यावेळी तिच्या डोळ्यांची भुरळ त्यांनाही पडली होती. त्यांच्या पहिल्या भेटीतच संजय भन्साळींनी ऐश्वर्याला थेट एका ब्लॉकबस्टर चित्रपटाचीच ऑफर दिली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिस वर्ल्डचा किताब जिंकल्यानंतर, ऐश्वर्याने १९९७ मध्ये अभिनय क्षेत्रामध्ये डेब्यू केले. मणिरत्नम दिग्दर्शित 'इरुवर' हा ऐश्वर्याचा पहिला चित्रपट होता. तर त्याच वर्षी प्रदर्शित झालेल्या 'और प्यार हो गया' या चित्रपटातून ऐश्वर्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

२ वर्षांनंतर, ऐश्वर्या 'ताल' या चित्रपटात दिसली ज्यामध्ये तिने केलेल्या अभिनयाची, तिने केलेल्या क्लासिकल डान्सचे सर्वच स्तरातून कौतुक झाले. पण तरीही १९९९ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हम दिल दे चुके सनम' चित्रपटातूनच तिला प्रसिद्धी मिळाली. पण तिला 'हम दिल दे चुके सनम' हा चित्रपट ऑडिशनमुळे नाही तर, तिच्या सौंदर्यामुळे तिला तो मिळाला. (Actress)

संजय लीला भन्साळी यांनी एका फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याला माध्यमांसोबत संवाद साधला होता. मुलाखतीमध्ये दिग्दर्शक संजय लीला भन्साळींनी सांगितले की, “ ‘राजा हिंदुस्तानी’च्या स्क्रिनिंगवेळी ऐश्वर्या माझ्यासोबत बोलत होती. तुम्ही दिग्दर्शित केलेला ‘खामोशी’ चित्रपट मला खूप आवडला, असं मला ऐश्वर्या म्हणाली. तेव्हा मला तिच्या डोळ्यामध्ये एक वेगळेच सौंदर्य दिसले. तिच्या डोळ्यांवर मी खूपच प्रभावित झालो होतो. तुला चित्रपटामध्ये डायलॉग जरी नाही दिला तरी चालेल. तुझे डोळेच बोलके आहेत.” (Bollywood Film)

त्यावेळी भन्साळी 'हम दिल दे चुके सनम' चित्रपटातल्या अभिनेत्रीच्या शोधात होते. ऐश्वर्याला पाहताच तिला त्यांनी चित्रपटामध्ये नंदिनीची भुमिका दिली. नंतर, या भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. १९९९ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ५१ कोटींचा गल्ला जमावला होता. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

SCROLL FOR NEXT