Sanjay Dutt Birthday Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sanjay Dutt Injured: मोठी बातमी: 'केडी-द डेव्हिल'च्या शूटिंगदरम्यान संजय दत्तला गंभीर दुखापत, हात-चेहऱ्यावर जखम

Sanjay Dutt Latest News: केडी-द डेव्हिलच्या शूटिंगदरम्यान 'संजय दत्त'ला गंभीर दुखापत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Sanjay Dutt Injured: बॉलिवूड सुपरस्टार संजय दत्त चित्रपटसृष्टीत त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. अशातच संजय दत्तबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. शूटिंगदरम्यान संजय जखमी झाला आहे.

संजय सध्या त्याच्या आगामी 'केडी - द डेव्हिल' (KD-The Devil) या कन्नड चित्रपटाचे शूटिंग बेंगळुरूच्या आसपासच्या भागात करत आहे. या चित्रपटात बॉम्बस्फोटाच्या सीक्वेन्सचे शूटिंग सुरू होते. या बॉम्बस्फोटाचे शूटिंग करताना संजय जखमी झाला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संजयच्या हात आणि चेहऱ्यावर खूप जखमा झाल्या आहेत. या घटनेनंतर चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आले आहे. संजय फाईट मास्टर डॉ. रवि वर्मा यांच्या 'केडी: द डेव्हिल' या चित्रपटासाठी फाईट कम्पोज करत होता. (Latest Marathi News)

याच दरम्यान त्यांचा अपघात झाला. या बातमीनंतर संजयचे चाहते चांगलेच चिंतेत पडले आहेत. तो लवकर बारा व्हावा यासाठी सर्वजण प्रार्थना करत आहेत.

केडी: द डेव्हिलमध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसणार

'KGF Chapter 1' आणि 'KGF Chapter 2' नंतर संजय दत्त पुन्हा एकदा खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. कन्नड चित्रपट 'केडी: द डेव्हिल'मध्ये संजय दत्त अॅक्शन हिरो ध्रुव सरजा सोबत खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

नुकताच ध्रुव सरजा यांच्या 'मार्टिन' चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे, जो त्याच्या चाहत्यांना खूप आवडला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Urine Infection In Monsoon : पावसाळ्यात वारंवार होतेय युरिन इन्फेक्शन? मग 'या' चुका अजिबात करूच नका

Maharashtra News Live Update: पंढरपूरात पैशाची मागणी करत हल्ला; गाडीची तोडफोड

Yavtmal : निकृष्ट सोयाबीन बियाण्यांवर मोठी कारवाई; १० प्रकरणांत गुन्हे, दोन कोटींच्या बियाण्यांच्या विक्रीवर बंद

ITR Filing 2026 : पगार १२.७५ लाखांपर्यंत असला तरीही भरावे लागेल टॅक्स, काय त्यामागचं नेमकं कारण?

Wi-Fi Tips : Wi-Fi चा स्पीड वाढवायचा आहे? ८ सोप्या ट्रिक्सने इंटरनेट होईल सुपरफास्ट

SCROLL FOR NEXT