Aai Kuthe Kay Karte 3 July Update  Saam TV
मनोरंजन बातम्या

Aai Kuthe Kay Karte Update : संजना जोमात, अन्या कोमात! वीणाविरुद्ध कारस्थान करणाऱ्या अनिरुद्धचं पितळ संजना उघडं पाडणार

Arundhati Supported Veena : वीणाला तिचा नवरा सतत फोन करत असल्याचे तिने अरुंधतीला सांगितलं आहे.

Pooja Dange

Sanjana Tells Arundhati About Veena's Phone : 'आई कुठे काय करते' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. महाराष्ट्रात घराघरात ही मालिका पहिली जाते. मालिकेत रोज काहीतरी नवीन पाहयला मिळतं. वीणाच्या येण्याने मालिकेला एक वेगळच वळण मिळालं आहे. आता वीणाच्या भूतकाळातील काही गोष्टी समोर येताना दिसत आहेत. मालिकेतील नव्या वळणामुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

'आई कुठे काय करते' ही मालिका प्रेक्षक रोज न चुकता पाहतात हे टीआरपीवरून लक्षात येतं. मालिकेचा नविन प्रोमो नुकताच सोशल मीडियावर रिलीज झाला आहे. या प्रोमोत सुरवातील अनिरुद्ध आणि वीणा केळकरांच्या घरात दिसतात.

अनिरुद्ध वीणाला ओरडून म्हणतो की,'जो कोणी तुला त्रास देतोय मी त्याला सोडणार नाही. तुझ्या जुन्या फोनचा नंबर दे.' असं म्हणून तिच्याकडून फोन नंबर घेतो आणि त्या नंबरवर फोन लावतो आणि म्हणतो, 'लागला फोन... अरे हिम्मत असेल तर माझ्याशी बोल' त्यानंतर तो वीणाला म्हणतो, 'त्याने फोन उचलला आणि कट केला. २४ तासाच्या आत या माणसाचं लोकेशन तुझ्याजवळ असेल'.

तर दुसरीकडे संजना अरुंधतीला विचारते की, 'वीणाने अनिरुद्धला दुसरा फोन दिलाय का? त्याच्याकडे नवीन फोन आहे. काल निखिलला त्याच्याकडे एक मोबाईल सापडला. त्याने तो फोन कपाटात लपवला होता'.

जर वीणाचा फोन हा अनिरुद्धकडे आहे तर अनिरुद्ध वीणासमोर फोनवर कोणाशी बोलला आणि संजनाने सांगितलेल्या माहितीमुळे अरुंधती अनिरुद्धवर संशय घेणार का? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात उपस्थित होतील.

मालिकेत मागील काही भागात वीणा तिच्या नवऱ्यामुळे खूप अस्वस्थ दिसत आहे. तिचा नवरा अमन हा तिला सारखा फोन करतो हे वीणाने अरुंधतीला सांगितलं आहे. त्यामुळे अरुंधतीला मोठा धक्काच बसला आहे.

तर याआधी वीणाचा फोन हरवल्याने ती घाबरलेली असते. पण हा फोन अनिरुद्धकडे आहे. त्याने वीणाच्या फोनमध्ये तिच्या वैयक्तिक गोष्टी पाहिल्या आहेत. तर वीणाच्या या फोनमध्ये असं काय आहे की तो हरवल्याने वीणा एवढी घाबरली आहे. अनिरुद्धला मिळालेल्या माहितीने तो कोणती नवी खेळी खेळतो आणि केळकर कुटुंबात कोणतं वादळ आणतो, हे आपल्याला येणाऱ्या भागात कळणार आहे. (Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Blood Pressure: उन्हात गेल्यावर अचानक BP वाढतोय? वाचा रामबाण घरगुती उपाय

विद्यार्थ्यांना दरमहा 2500 रुपये मिळणार? विद्यार्थ्यांसाठी सरकारची नवी योजना?

Kokan Top 10 Places: कोकणात फिरायला जात असाल तर ही TOP 10 ठिकाणं नक्की पाहा, हिरव्यागार निसर्गात जाल हरवून

Maharashtra News Live Update: नेरूळमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

SRH vs DC: अभिषेक शर्माच्या शतकाच्या मदतीनं हैदराबादने दिल्लीला दिली मात,SRHच्या विजयानंतर Points Table मध्ये मोठी उलथापालथ

SCROLL FOR NEXT