Surbhi Hande  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sangharsh Yodha Movie: 'संघर्षयोद्धा'तून सुरभी हांडे येतेय भेटीला, मनोज जरांगे पाटील यांच्या पत्नीच्या भूमिकेत

Surbhi Hande Movie: मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित 'संघर्षयोद्धा' हा चित्रपट (Sangharsh Yodha Movie) येत्या २६ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले असून प्रदर्शनसाठी तयार झाला आहे.

Priya More

Sangharsh Yodha Movie:

मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावं यासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांचा जीवनप्रवास लवकरच रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित 'संघर्षयोद्धा' हा चित्रपट (Sangharsh Yodha Movie) येत्या २६ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले असून प्रदर्शनसाठी तयार झाला आहे. या चित्रपटात अभिनेत्री सुरभी हांडे ही मनोज जरांगे पाटील यांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. एका लढवय्या कार्यकर्त्याच्या लढवय्या पत्नीची भूमिका सुरभी साकारत आहे. त्यामुळे तिचे कौतुक केले जात आहे.

'संघर्षयोद्धा' या चित्रपटाचे दिग्दर्शन शिवाजी दोलताडे यांनी केले आहे. सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलताडे यांनी या चित्रपटाचं लेखन आणि निर्मिती केली आहे. या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची भूमिका अभिनेता रोहन पाटीलने साकारली आहे. यासोबतच या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, सुरभी हांडे, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर , सोमनाथ अवघडे , किशोर चौगुले , सिद्धेश्वर झाडबुके हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 

मनोज जरांगे पाटील यांच्या आजवरच्या वाटचालीत त्यांच्या पत्नीची जबाबदारी महत्त्वाची ठरलीय. मनोज जरांगे पाटील समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी लढत असताना घरच्या जबाबदाऱ्या पार पाडत होती. त्यामुळेच जरांगे पाटील हे वादळ महाराष्ट्रभर फिरू शकलं. आरक्षणासाठी लढणारा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या पत्नीचा संघर्षही तितकाच मोठा आहे. त्यामुळे एका लढवय्या कार्यकर्त्याच्या पत्नीच्या संघर्षाची कहाणी या चित्रपटात दाखवली जाणार आहे. ही आव्हानात्मक भूमिका अभिनेत्री सुरभी हांडे साकारत आहे.

सुरभी हांडेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, 'जय मल्हार', 'गाथा नवनाथांची', 'लक्ष्मी सदैव मंगलम' अशा टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. 'अगं बाई अरेच्चा २' अशा चित्रपटांतून सुरभी हांडेने आपल्या अभिनयाचं दर्शन घडवलं आहे. तिच्या आजवरच्या भूमिकांमध्ये संघर्षयोद्धा चित्रपटातली भूमिका सर्वांत वेगळी ठरणार आहे. जरांगे पाटील पती-पत्नीचं नातं या चित्रपटातून पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर येणार आहे. 26 एप्रिल रोजी हा चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lizard Chirping: घरात बोलताना पाल चुकचुकली तर सगळं बोलणं होतं खरं? यामागचं कारण एकदा नक्कीच वाचा

Maharashtra Live News Update : पुणे महापालिकेत रिव्हॉल्व्हर काढून जीव देण्याची धमकी देणं भोवलं

NCP Merger: पुणे जिल्ह्यात विलिनीकरणाचं पहिलं पाऊल; अतुल बेनके-अमोल कोल्हेंचा मोठा निर्णय, जुन्नरमध्ये घडलं, आता राज्यात कधी?

Sunetra Pawar: दु:खातून सावरल्या, कामाला लागल्या; सुनेत्रा पवारांच्या पाठबळामुळे कार्यकर्त्यांना धीर

वर्गमित्राच्या खोलीत सापडला ३ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या MBA विद्यार्थिनीचा निर्वस्त्र मृतदेह; व्हॉट्सअॅप ग्रुपवर आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT