Sanchita Ugale Death Saam tv
मनोरंजन बातम्या

Sanchita Ugale Death: 'गरज असताना कोणीही आलं नाही...' अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर प्रसिद्ध अभिनेता भावूक

Sanchita Ugale Death: अभिनेत्री संचिता उगलेच्या निधनानंतर अभिनेता शीजान खानने भावनिक व्हिडिओ शेअर केला. नातेसंबंध जपण्याचे महत्त्व सांगत त्याने सोशल मीडियावर फक्त श्रद्धांजली देऊ नका, असे सांगितले.

Shruti Vilas Kadam

Sanchita Ugale Death: टीव्ही अभिनेत्री संचिता उगले हिच्या निधनाने संपूर्ण मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे. अवघ्या 30 वर्षांच्या वयात अभिनेत्रीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, तिचा मृतदेह तिच्या राहत्या घरातील छताच्या पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत. संचिताच्या अकाली जाण्याने चाहते, मित्रपरिवार आणि सहकलाकारांमध्ये शोककळा पसरली आहे.

दरम्यान, टीव्ही अभिनेता शीजान खानने संचिताच्या निधनानंतर सोशल मीडियावर एक भावनिक व्हिडिओ शेअर करत अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. या व्हिडिओमध्ये त्याने केवळ संचितालाच श्रद्धांजली वाहिली नाही, तर समाजातील बदलत्या नातेसंबंधांवरही भाष्य केले आहे.

व्हिडिओमध्ये शीजान म्हणतो, 'एखादी व्यक्ती गेल्यानंतर आपण तिच्याबद्दल अनेक पोस्ट लिहितो, दुःख व्यक्त करतो, पण ती व्यक्ती आपल्यासोबत असताना आपण तिच्यासाठी किती वेळ काढला होता, हा खरा प्रश्न आहे.' त्याच्या मते, सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहणे सोपे असते, पण एखाद्याची वेळोवेळी विचारपूस करणे आणि त्याच्याशी संपर्क ठेवणे अधिक महत्त्वाचे असते.

शीजानने पुढे लोकांना आत्मपरीक्षण करण्याचे आवाहन केले. तो म्हणाला, 'जेव्हा एखादा मित्र किंवा जवळची व्यक्ती हळूहळू दूर जाऊ लागते, तेव्हा आपण शेवटचा फोन कधी केला होता? आपण स्वतःहून त्यांची विचारपूस करण्यासाठी पुढाकार कधी घेतला होता? मला त्याच्याशी बोलायला हवे होते’ कदाचित मी बोललो असतो तर ती व्यक्ती असती अशा पोस्ट करण्यापेक्षा ती आपल्या आयुष्यात असताना तिच्यासोबत संवाद साधणे अधिक गरजेचे आहे.'

व्हिडिओच्या शेवटी शीजान खानने सर्वांना एक महत्त्वाचा संदेश दिला. 'पश्चात्तापाचे हे चक्र थांबवा. आपल्या मित्रांशी, कुटुंबीयांशी आणि प्रियजनांशी वेळ काढून संपर्क ठेवा. त्यांच्यासाठी वेळ काढा, त्यांची विचारपूस करा. कारण कधीकधी एक फोन कॉल किंवा एक साधी चौकशीदेखील एखाद्याच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकते,' असे तो शेवतटी म्हणाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT