Bigg Boss Ott 3 Winner Sana Makbul Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss OTT 3 Winner : सना मकबूलने जिंकली 'बिग बॉस ओटीटी 3'ची ट्रॉफी, इतक्या लाखांचं मिळालं बक्षीस

Bigg Boss OTT 3 News: बिग बॉस ओटीटी 3 च्या ग्रँड फिनालेमध्ये सना मकबूलने सर्व स्पर्धकांना मागे सोडत शोची ट्रॉफी जिंकली आहे.

साम टिव्ही ब्युरो

बिग बॉस ओटीटी 3 च्या ग्रँड फिनालेमध्ये सना मकबूलने सर्व स्पर्धकांना मागे सोडत शोची ट्रॉफी जिंकली आहे. सना मकबूलने रॅपर नेझीला हरवून शोचे विजेतेपद पटकावलं आहे. सना मकबूल आणि नेझी शेवटच्या टॉप 2 मध्ये होते, ज्यात सना जिंकली. सना आधीच शोच्या ट्रॉफीची मोठी दावेदार मानली जात होती. आता सना मकबूलच्या विजयानंतर तिचे चाहते खूप खुश दिसत आहेत.

रणवीर शौरी, साई केतन राव, सना मकबूल, नेझी आणि कृतिका हे टॉप 5 फायनलिस्ट होते. यात सना जिंकली असून तिला 25 लाखांचे रोख बक्षीस मिळालं आहे.

कोण आहे सना मकबूल?

सना मकबूल ही एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे. तिने तेलुगू आणि तमिळ चित्रपटांमध्येही काम केले आहे. सना मकबूलने 2009 मध्ये MTV Scooty Teen Diva मध्ये भाग घेतला होता.

2010 मध्ये तिने 'ईशान: सपना को आवाज दे' या शोमध्ये काम केले होते. तिने 'कितनी मोहब्बत 2', 'इस प्यार को क्या नाम दूं', 'अर्जुन', 'आदत से मजबूर', 'विश' सारखे शो केले आहेत.

सना 2021 मध्ये 'खतरों के खिलाडी 11' मध्येही दिसली होती. 2023 मध्ये, अभिनेत्रीने खुलासा केला होता की, तिला हेपेटायटीस आहे. यानंतर अनेक शो तिच्या हातून निसटले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT