Sameer Wankhede Reaction On Jawan  Saam TV
मनोरंजन बातम्या

Jawan Trailer: शाहरुखच्या 'त्या' एका डायलॉगमुळे जवानचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर समीर वानखेडे होतायेत ट्रेंड

Shah Rukh Khan Dialogue From Jawan: जवानमधील डायलॉगचा संदर्भ आर्यन खान आणि समीर वानखेडे यांच्याशी जोडत आहेत.

Pooja Dange

Sameer Wankhede Tweet:

शाहरुख खानच्या जवान या आगामी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर त्यातील संवादांनी लोकांचे लक्ष वेधून घेतलं आहे.

जवान चित्रपटामध्ये शाहरुख खानचा एक डायलॉग आहे, 'बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर.' नेटकरी आता या डायलॉगचा संदर्भ आर्यन खान आणि समीर वानखेडे यांच्याशी जोडत आहेत. तसेच समीर वानखेडे यांनी देखील याला उत्तर दिले असल्याचे म्हणत आहेत.

समीर वानखेडे ट्वीट

समीर वानखेडे यांनी त्यांच्या ट्विटरवर म्हणजे आता एक्सवर लिहिले आहे की, 'मी माझ्या जीवनात अनेकदा होरपळलो आहे, पराभवाची धूळ चाखली आहे आणि आनंदात नाचों देखील आहे. मला मार्कांची भीती नाही. माझ्या या ओली नेहमी प्रेरणा देतात.' 'I have licked the fire and danced in the ashes of every bridge I ever burned. I fear no hell from you. Nicole Lyons. A quote that always inspires me!) हे ट्विट त्यांनी काही न्यूज चॅनेल आणि राहुल गांधी यांनी टॅग केले आहे.

फॅन पेज ट्वीट

शाहरुख खानच्या जवानचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर काही मिनिटातच एका फॅन पेजवरून ट्विट केले होते की, 'बेटे को हात लगाने से पेहले बात से बात कर' हा समीर वानखेडे यांनी डायरेक्ट मेसेज आहे. तसेच या डायलॉगनंतर लगेच प्रॉड्यूस बाय गौरी खान असे येते.'

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला 2021 मध्ये ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आले होते. ही अटक समीर वानखेडे यांनी केली होती. यादरम्यान समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले होते. त्यांचे आणि शाहरुख खानचे चॅट देखील काही महिन्यांपूर्वी व्हायरल झाले होते.

जवान ट्रेलर

या चित्रपटामध्ये शाहरुख खान डबल रोल करताना दिसत आहे. जवानची कथा बाप-लेकाभोवती फिरते. जवानच्या ट्रेलरमध्ये अनेक दमदार डायलॉग आहेत. त्यातील एका डायलॉगचा थेट संबंध समीर वानखेडे यांच्या जोडण्यात आला आहे. तर आणखी एका डायलॉगमध्ये शारुखने आलियाचे नाव घेतले आहे. (Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT