वानखेडे कुटुंबानी पुन्हा ठोठावला न्यायालयाचा दरवाजा! Saam Tv
मनोरंजन बातम्या

वानखेडे कुटुंबानी पुन्हा ठोठावला न्यायालयाचा दरवाजा!

कार्डिलिया क्रूझ प्रकरणापासून चर्चेमदजे असलेले NCB चे अधिकारी समीर वानखेडे आणि त्यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी परत एकदा न्यायालयाचा दरवाजा ठोठावला

सूरज सावंत

मुंबई : कार्डिलिया क्रूझ (drugs case) प्रकरणापासून चर्चेमदजे असलेले NCB चे अधिकारी समीर वानखेडे (sameer wankhede) आणि त्यांच्या पत्नी क्रांती रेडकर (kranti redkar) यांनी परत एकदा न्यायालयाचा (court) दरवाजा ठोठावला आहे. यावेळी त्यांनी Google, twitter आणि Facebook यांना न्यायालयात खेचले आहे. दाम्पत्यांनी असे पाऊल का उचलले? (Sameer Kranti Wankhede knocked on the door of the court)

हे देखील पहा-

समीर वानखडे (sameer wankhede) आणि त्यांच्या पत्नी क्रांती रेडकर (kranti redkar) यांनी Google, twitter आणि Facebook यांना न्यायालयात खेचले आहे. या सोशल मिडियाच्या माध्यमातून वानखडे कुटुंबियांवर खालच्या पातळीत भाष्य करणाऱ्या किंवा बदनामी करणाऱ्या पोस्ट Google, twitter आणि Facebook यांनी थांबवाव्यात आणि त्या काढून टाकाव्यात असे आदेश न्यायालयाने द्यावेत. अशी विनंती वानखडे कुटुंबियांच्या वतीने करण्यात न्यायालयात केली आहे.

या प्रकरणात आतापर्यंत २ सुनावण्या झाले आहेत. मात्र, न्यायालयाने अद्याप कोणतेही आदेश पारित केलेेले नाहीत. या प्रकरणाची पुढील सुनावनी आता १७ डिसेंबर रोजी दिंडोशी कोर्टात होणार असल्याची माहिती वानखडे यांचे वकिल रोहन जनार्दन यांनी 'साम टिव्ही'ला दिली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जम्मू-काश्मीर विधानसभेत कलम ३७० वरून राडा, भाजप आमदारांनी प्रस्तावाच्या प्रती फाडून फेकल्या, VIDEO

NCP Symbol: मराठी वर्तमानपत्रात मोठ्या जाहिराती द्या; पक्ष आणि चिन्हावरून सुप्रीम कोर्टाचे अजित पवार गटाला निर्देश

Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मुंबईतच मुंबईकरांना शब्द; लाडकी बहीण, धनुष्यबाण चिन्ह, टोलमाफीवरही सर्व काही बोलले!

Relationship Tips: ब्रेकअप का होतो? ही आहेत प्रमुख कारणे

Muktainagar News : अपक्ष उमेदवारावर गोळीबार करणारा एकजण ताब्यात; दोघे अजूनही फरार

SCROLL FOR NEXT