Samay Raina India’s Got Latent Saam Tv
मनोरंजन बातम्या

India’s Got Latent controversy: 'इंडियाज गॉट लेटेंट' शोवर बंदी येणार? महिला आयोगाकडून कारवाईसाठी मोठं पाऊल

Samay Raina India’s Got Latent: स्टँड-अप कॉमेडियन समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' या यूट्यूब शोवरून वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे महिला आयोगाने पोलिसांना पत्र लिहून शो बंद करण्याची मागणी केली आहे.

Shruti Vilas Kadam

India’s Got Latent controversy: स्टँड-अप कॉमेडियन समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' या यूट्यूब शोवरून वाद निर्माण झाला आहे. ॲड. अशिष रॉय व ॲड. श्री. पंकज मिश्रा यांनी महिलाआयोग आणि मुंबई पोलिस आयुक्त यांना या शोवर तत्काळ कारवाही करण्याचे पत्र देत शो बंद करण्याची मागणी केली आहे. या पत्रावर कारवाई करत महिला आयोगाने मुंबई पोलिस आयुक्त यांना या शोवर तत्काळ बंदी घालण्याची मागणी केली आहे.

"इंडियाज गॉट लेटेंट शो" मध्ये लोकप्रियतेच्या नावाखाली महिलांचा सन्मान दुखावेल असे वक्तव्य समय रैना, रणवीर अलाहाबादी, अपूर्वा मखिजा आणि इतर सहाकाऱ्यांनी केल्या प्रकरणी ॲड. अशिष रॉय व ॲड. पंकज मिश्रा यांनी तक्रार अर्ज महिलाआयोग कार्यालयात दाखल केला होता. त्यावर महिला आयोगाने आणि मुंबई पोलिस आयुक्त यांना यावर तत्काळ कारवाही करण्याचं पत्रही देण्यात आले आहे.

युट्युबर रणवीर अलाहाबादी याने एका कार्यक्रमात पालक आणि मुलांबाबत केलेल्या अभद्र टिकेप्रकरणी सर्वच स्तरातून टीका झाली या विरोधात एडवोकेट आशिष रॉय यांनी राज्य महिला आयोगाकडे कारवाईसाठी तक्रार केली होती या तक्रारीची दखल घेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी देखील आता मुंबई पोलीस कमिशनर यांना या संदर्भात कारवाई करण्यासाठी पत्र लिहिले आहे पालक आणि मुलांबाबत केलेल्या अश्लील शेरेबाजी प्रकरणी या शो वर बंदी घालावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे.

यापूर्वी देखील समय रैनाच्या कॉमेडी शो इंडियाज गॉट लेटॅलेंट विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. शोच्या एका भागात, अरुणाचल प्रदेशातील स्पर्धक जेसी नाबामने अरुणाचल प्रदेशातील लोक कुत्रे खातात आणि स्वतःच्या पेटही खातात अशी टिप्पणी केली होती त्यामुळे अरुणाचल प्रदेश राज्यातील लोकांनी या शो विरोधात तक्रार दाखल केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT