Samay Raina India’s Got Latent Saam Tv
मनोरंजन बातम्या

Samay Raina India’s Got Latent: समय रैनाच्या शोमधील 'त्या' जोकमुळे नेटकरी संतप्त; कॉमेडियनची पोलिसात तक्रार दाखल

Samay Raina’s India’s Got Latent in legal troubles: समय रैनाच्या लोकप्रिय शो इंडियाज गॉट लेटेंटमधील एक स्पर्धक तिच्या विनोदामुळे अडचणीत सापडली आहे. त्याने शोमध्ये असा विनोद केला की, एका संतप्त नागरिकांनी पोलिसात तक्रार दाखल केली.

Shruti Vilas Kadam

Samay Raina India’s Got Latent: स्टँडअप कॉमेडियन समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटॅलेंट' या शोविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती आहे समोर आली आहे. ही तक्रार अरुणाचल प्रदेशातील जेसी नावाच्या एका स्पर्धकाने शोमध्ये केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीशी संबंधित आहे. तिने नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका भागात म्हटले होते की अरुणाचल प्रदेशात कुत्रे खाल्ले जातात. आता अरुणाचल प्रदेशातील एका व्यक्तीने तक्रार दाखल केली आहे. त्यांचा आरोप आहे की स्पर्धक जेसीने तिथल्या लोकांबद्दल अपमानास्पद टिप्पण्या केल्या.

समय रैनाचा कॉमेडी शो इंडियाज गॉट लेटॅलेंट वादात सापडला आहे. शोच्या एका भागात, अरुणाचल प्रदेशातील स्पर्धक जेसी नाबामने तिच्या राज्यातील लोकांबद्दल एक मजेदार टिप्पणी केली. तिचा स्टँडअप कॉमेडी अरुणाचल प्रदेशातील लोकांशी संबंधित होते.

जेसीने तिच्या स्टँडअपमध्ये सांगितले की केला की तिथे कुत्रे खाल्ले जातात. यावर समय रैनाने विचारले की तिने कधी कुत्र्याला खाल्ले आहे का? यावर जेसी म्हणाली, 'मला माहित आहे कारण माझे मित्र ते खातात.' बऱ्याच वेळा ते त्यांच्या पाळीव कुत्र्यांनाही खातात.

पोलिसात तक्रार दाखल

जेसीच्या टिप्पणीमुळे संतप्त होऊन, अरुणाचल प्रदेश पूर्व येथील रहिवासी अरमान राम वेली बखा यांनी इटानगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. अरुणाचल प्रदेशातील लोक कुत्रे खातात आणि स्वतःच्या पेटही खातात असे जेसीने राष्ट्रीय दूरचित्रवाणीवर म्हटले आहे असे लिहिले आहे. तक्रारदाराने पोलिसांना यावर कारवाई करण्याची विनंती केली आहे जेणेकरून इतर कोणीही असे वक्तव्य करणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rice or Chapati: भात की चपाती? शरीराला जास्त एनर्जी, फायबर आणि प्रोटीन कशातून मिळते? जाणून घ्या ७ गोष्टी

Maharashtra News Live Update: 9 व्या आंतरराष्ट्रीय प्राचार्य शैक्षणिक परिषदेचा समारोप सोहळा

Railway Block : देहूरोड–बेगडेवाडी दरम्यान उद्या रेल्वे ब्लॉक; लोकल रद्द, एक्सप्रेस गाड्यांच्या वेळेत बदल

Heart Transplant: वाडिया रुग्णालयात पहिल्यांदाच यशस्वी हृदय प्रत्यारोपण, 17 वर्षीय मुलाला नवं आयुष्य; ग्रीन कॉरिडॉरमुळे 25 मिनिटांत पोहोचलं हृदय

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज! या महिन्याच्या शेवटी खात्यात पैसे जमा होणार , ₹1500 की ₹3000 मिळणार? वाचा...

SCROLL FOR NEXT